IMD Today Weather: तिहेरी संकट! १६ राज्यांना इशारा; जोरदार वारं, भयंकर गारठा आणि मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात काय स्थिती?

Weather Alert: देशातील अनेक भागांत पाऊस, मेघगर्जना आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही भागांना पावसाचा इशारा आहे.
IMD Weather Update:
IMD Weather Update IMD warns Heavy rainfall Maharashtra delhi uttar-pradesh and 18 state in IndiaSaam TV
Published On: 

देशभरात हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने (IMD) देशातील १६ राज्यांत खराब हवामानाचा हाय अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि पर्वतीय क्षेत्रांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

काही ठिकाणी ७० किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामानातील बदलामुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामानाच्या या बदलामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही थंडीची चाहूल लागली असून पुढील २ दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसह देशातील १६ राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. डोंगराळ राज्यांमध्ये हवामान आणखी बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण या ठिकाणी बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी पडू शकतो.

पूर्व उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागांवर चक्रीवादळी स्थिती कायम आहे. सिक्कीमजवळ अशीच एक प्रणाली विकसित होत आहे. त्याशिवाय, आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकून १४ नोव्हेंबरच्या आसपास पावसाचे प्रमाण वाढवू शकते. ईशान्य भारतात मेघगर्जना आणि विजांचा धोका आहे. समुद्रातील जोरदार वाऱ्यांमुळे मच्छिमारांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IMD Weather Update:
Gold Limit : विवाहित महिलांकडे किती सोनं असावं? आता हिशेब द्यावा लागणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

हवामान विभागाने राजधानी दिल्ली आणि नोएडा आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी २० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, आग्रा, मथुरा, सोनभद्र, बांदा, प्रतापगड, बरेली, अमरोहा, कानपूर, हरदोई, पिलीभीत, जौनपूर, आंबेडकर नगर, शाहजहानपूर, बस्ती, आझमगड, अयोध्या, गाझीपूर, बलिया, देवरिया, गोंडा आणि गोरखपूर या ठिकाणी हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा असेल असा अंदाज आहे.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बोकारो, पलामू, गुमला, धनबाद, सिमडेगा, जमशेदपूर, चत्रा, देवघर, दुमका आणि हजारीबाग येथे मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे.

IMD Weather Update:
RBI New Rules : बँक खात्याशिवाय पाठवता येणार ५० हजार रुपये; RBI चे नवे नियम लागू

पश्चिम बंगालच्या अनेक भागांसाठी पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोलकातामध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. राजस्थानातही हवामान बदलणार आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी कोटा, जयपूर, चुरू, अजमेर, उदयपूर, भरतपूर, जैसलमेर, जालोर, करौली, श्रीगंगानगर, चित्तूरगड, हनुमानगड, पाली, राजसमंद आणि बिकानेरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काही दिवस दक्षिण भारतात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये १२ ते १७ नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडू शकतो. १५ नोव्हेंबर रोजी या भागांमध्ये सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असून, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. १२ नोव्हेंबरसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या राज्यांमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचाही समावेश आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. अंदमान समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.