RBI New Rules : बँक खात्याशिवाय पाठवता येणार ५० हजार रुपये; RBI चे नवे नियम लागू

How to transfer ₹50,000 without a bank account : रिझर्व्ह बँकेने ११ नोव्हेंबर २०२६ रोजी डोमेस्टिक मनी ट्रान्सफरचे नवे नियम लागू केले आहेत. बँक खाते नसलेली व्यक्ती बँकेच्या शाखेतून रोख रक्कम भरून NEFT द्वारे ५० हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकते.

How to send money without a bank account : रिझर्व्ह बँकेने (RBI) पैसे पाठवण्याचे नियम अत्यंत सोपे केले आहेत. आता बँक खातं नसलेले नागरिकही सहज पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. आरबीआयकडून आजपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बँक खात्याशिवाय ५० हजार रुपये पाठवता येणार आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळलाय. (Check RBI's New NEFT Transfer Limits and Rules)

बँक खाते नसतानाही एकाच वेळी ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम एनईएफटीद्वारे पाठवणे आता शक्य होणार आहे. रोख स्वरूपात एका वेळी १०, हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतात. तर एका व्यक्तीसाठी महिनाभरात कमाल २५,००० रुपयांची मर्यादा ठरवण्यात आली आहे. बँक खाते नसलेली कोणतीही व्यक्ती एटीएम किंवा बँकेच्या अधिकृत एजंटमार्फत सुलभतेने पैसे पाठवू किंवा मिळवू शकते.

एजंट किंवा एटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवताना एकाच वेळी जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात. आरबीआयच्या या नव्या नियमानुसार हे सर्व पैसे ट्रान्सफरचे व्यवहार तात्काळ (रिअल-टाइम) पूर्ण होणार आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.