

काही अहवालांनुसार 25 राज्यांमध्ये हवामानाचा प्रभाव राहण्याची शक्यता
महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी 11 सप्टेंबरला वादळी वारे, विजांचा कडकडाट
महाराष्ट्राच्या काही भागांत 12 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाची शक्यता
देशभरात मान्सूनच्या वादळी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. भारतीय हवामान विभागाने ११ सप्टेंबर २०२६ साठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील २० तासांत देशातील २५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी ७५ किलोमीटर वेगाचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, कश्मीर, तामिळ, कर्नाटक, कर्नाटक आणि कर्नाटकात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
१४ आणि १५ सप्टेंबर रोजी हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबमधील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वायव्य भारतातील उर्वरित भागांतील काही ठिकाणी हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नजफगड, सफदरजंग, पालम, पीतमपुरा आणि कुतुबमिनारसह राजधानीच्या बहुतांश भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर असू शकतो. दिल्लीतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, नोएडा, गाझियाबाद, वाराणसी, प्रयागराज, बरेली आणि मेरठसह अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे; येथे वाऱ्याचा वेग ताशी ७० किमीपर्यंत पोहोचू शकतो. बिहारमधील पाटणा, गया, मुझफ्फरपूर, भागलपूर आणि पूर्णियासह अनेक जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
राज्यात काही भागात पावसाची हलक्या सरी हजेरी लावत असल्या तरी बहुतांश भागात अद्याप उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली आहे.
धुळे, नंदुरबार, नाशिक घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर बहुतांश भागात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
११ ते १४ सप्टेंबर दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ आणि १२ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान डोंगराळ राज्य असलेल्या उत्तराखंडमध्ये सर्वदूर पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. १० ते १३ सप्टेंबर या कालावधीसाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने छत्तीसगड, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. समुद्रावर ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने किनारपट्टीवरील भागांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.
भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरसह मध्य प्रदेशातील अनेक भागांत ताशी ६५ किमी वेगाच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील बहुतांश भागांत १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ सप्टेंबर रोजी काही भागांत अति मुसळधार पावसाचा, तर ११ आणि १३ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व मध्य प्रदेशात ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून, १० ते १२ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.