Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Maharashtra Drought Crisis : अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट आहे. खरीप हंगाम हातचा गेल्यानं बळीराजा हतबल झालाय. राज्यात किती जिल्ह्यांमधल्या किती तालुक्यांना दुष्काळाचा झळा बसतायेत ? राज्य सरकारने काय महत्वाचा निर्णय घेतलाय? पाहूयात स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमधून .
Maharashtra Drought Crisis  :
Maharashtra Drought Crisis: 83 Talukas Across 19 Districts Face Drought-like Conditionssaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमधील 83 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

  • खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ज्वारी, कापूस आणि बाजरीसह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे.

  • मराठवाड्यात 30 टक्क्यांहून अधिक पावसाची तूट असल्याने काही भागांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक

राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. जवळपास निम्मे महाराष्ट्रात गेल्या महिना भरापासून पावसाची एकही सर बरसलेली नाही. यात उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वाधिक तालुक्यांचा समावेश आहे. तर मराठवाड्यात 30 टक्के पेक्षा अधिक पावसाची तूट निर्माण झाल्यामुळे धरणं आटायला लागली आहेत. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ज्वारी, कापूस, बाजरी आणि इतर कड धान्यांची पिके जवळपास बळीराजाच्या हातातून गेली आहेत. राज्यातील सुमारे 19 जिल्ह्यांमधल्या 83 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असून शेतकऱ्यांसमोर गहिरं संकट निर्माण झालाय. कोणत्या जिल्ह्यांच्या किती तालुक्यांना याचा फटका बसलाय ते पाहूयात.

Maharashtra Drought Crisis  :
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट

उत्तर महाराष्ट्र - 31 तालुके

जळगाव 13

अहिल्यानगर 9

नाशिक 7

धुळे 2

विदर्भ - 20 तालुके

बुलढाणा 7

अकोला 5

अमरावती 4

वाशीम 2

वर्धा 1

नागपूर 1

मराठवाडा - 17 तालुके

बीड 6

संभाजीनगर 4

धाराशिव 4

परभणी 2

जालना 1

पश्चिम महाराष्ट्र - 15 तालुके

पुणे 6

सोलापूर 4

सातारा 4

सांगली 1

Maharashtra Drought Crisis  :
जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

सरकारनंही याची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनीही दुष्काळाच्या परिस्थितीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिलीय. याआधीच मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय. त्यामुळे महसूल खात्यानं तातडीनं दुष्काळी परिस्थितीचं सर्वेक्षण करून आताच उपाय योजण्याची गरज आहे. अन्यथा नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडे नेणार आणि बळीराजाचा जीव जाणार अशी परिस्थिती होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com