IDFC फर्स्ट बँकेत 590 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा, बँकिंग क्षेत्रात खळबळ

IDFC Bank Scam : आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत ५९० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे. जो हरियाणा सरकारच्या खात्यांशी जोडलेला आहे. नियमित खाते बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा घोटाळा उघडकीस आला.
IDFC Bank Scam :
IDFC First Bank branch in Chandigarh where a ₹590 crore financial irregularity linked to government accounts was detected.saam tv
Published On
Summary
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत ₹590 कोटींचा मोठा घोटाळा उघड.

  • हरियाणा सरकारच्या खात्यांमध्ये शिल्लक तफावत आढळली.

  • नियमित खाते बंद प्रक्रियेदरम्यान आर्थिक अनियमितता समोर आली.

चंदीगडमधील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या एका प्रमुख शाखेत कोट्यवधी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शाखेत 590 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण आर्थिक घोटाळा थेट हरियाणा सरकारच्या खात्यांशी संबंधित आहे. हा घोटाळा कोणत्याही तपास यंत्रणेमार्फत उघडकीस आला, तर एका सामान्य प्रक्रियेदरम्यान उघड झाला आहे.

IDFC Bank Scam :
मोठी बातमी!अंबानी पुन्हा ईडीच्या रडारवर! ४० हजार कोटींचा बँक घोटाळा; २६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

असा उघडकीस आला घोटाळा

प्राथमिक तपासानुसार, काही बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवहार केलेत. घोटाळ्याची बाब उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासन अलर्ट झालं आहे. १८ फेब्रुवारी २०२६ पासून हरियाणा सरकारशी संलग्न असलेल्या अनेक संस्थांनी चंदीगडमधील या बँकेच्या शाखेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट त्यांचे अधिकृत खाते बंद करणे.

IDFC Bank Scam :
PM Mudra Yojana: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

त्यात जमा असलेला सर्व निधी दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करणं हे होते. ही एक नियमित प्रक्रिया होती, पण कागदपत्रांची प्रक्रिया जशी पुढे सरकत गेली तशी बॅलन्स शीटमध्ये मोठी तफावत दिसून आली. सरकारने नोंदवलेली शिल्लक आणि बँकेच्या प्रणालीतील प्रत्यक्ष शिल्लक यामध्ये एक महत्त्वाची तफावत आढळून आली आहे. कागदपत्रे आणि वास्तवातील या तफावतीमुळे घोटाळ्याची संपूर्ण व्याप्ती उघड झालीय.

चार कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापनाने तात्काळ कारवाई करत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या गंभीर प्रकरणाची प्राथमिक चौकशी म्हणून चंदीगड शाखेतील चार संशयित अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांचे निलंबन कायम राहील असे बँकेने जाहीर केले आहे. या फसवणुकीत सहभागी असलेल्या कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा बाहेरील व्यक्तीला सोडले जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com