IAS Transfer: बदल्यांचा धडाका! २१ बड्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या, वाचा कुणाची कुठे नियुक्ती?

Joint Secretaries Refushuffle in Administration: केंद्र सरकारने प्रशाकीय बदल केले आहे. २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये अनेक आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
IAS Transfer
IAS TransferSaam Tv
Published On
Summary

प्रशासकीय पातळीवर मोठे बदल

सहसचिव आणि महासचिव स्तरावरील अनेक अधिकाऱ्यांची बदली

२१ अधिकाऱ्यांची केली बदली

केंद्र सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. केंद्र सरकारने सहसचिव आणि महासचिव स्तरावरील अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आहे.एकूण २१ अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने या बदलाला परवानगी दिली आहे. विविध मंत्रालयांमध्ये अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

IAS Transfer
मोठी बातमी! 17 IAS आणि 46 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती? वाचा यादी

२१ अधिकाऱ्यांची बदली (21 Joint secrataries Transfer)

संरक्षण, गृह, ग्रामीण विकास, आरोग्य, सहकार,पंचायत राज आणि सामान्य न्याय अशा मंत्रालयांमध्ये या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता नवीन अधिकारी या मंत्रालयात काम करणार आहेत. यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. याचसोबत भारतीय नवसेवा, महसूल सेवा विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची झाली बदली (IAS-IPS Transfer)

  • दीपा चावला (IRAS 1998): यांची बदली सहसचिव म्हणून करण्यात आली आहे, त्यांना मंत्रिमंडळ सचिवालयांतर्त सचिव (सुरक्षा)यांचे कार्यालय देण्यात आले आहेत.

  • गोपाल सिंह (IFoS: 2003: BH) यांची कोळसा मंत्रालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • अमित कुमार (IAS: 2010) : वाणिज्य विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती

  • शिव पाल सिंह (IFoS: 1997: UP) यांची नियुक्ती सहकार मंत्रालयात सहसचिव म्हणून केली आहे.

  • नेहा बन्सल यांची नियुक्ती अतिरिक्त महासंचालक, अभिलेख व्यवस्थापन, भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार विभागात केली आहे.

  • विजय नामदेवराव झाडे (IAS: 2002) यांची नियुक्ती सहसचिव संरक्षण आणि उत्पादन विभागात केली आहे.

  • प्रकाश राहपुरोहित यांचीही नियुक्ती सहसचिव संरक्षण आणि उत्पादन विभागात केली आहे.

  • डी. सेंथिल पांडियन (IAS: 2002) यांची नियुक्ती सहसचिव पेयजल व स्वच्छता विभागात केली आहे.

  • श्रीनिवास राव गांगा रेड्डी यांची नियुक्ती पृथ्वी विज्ञान मंत्रालयात सहसचिव म्हणून झाली आहे.

  • सुरभी राय यांची नियुक्तीमत्स्यव्यवसाय विभागात सहसचिव म्हणून केली आहे.

  • मनीषा सक्सेना यांची नियुक्ती आरोग्य संशोधन विभागात सहसचिव म्हणून केली आहे.

IAS Transfer
40 IAS अधिकाऱ्यांची रातोरात बदली; प्रशासनात मोठी खळबळ, कुणाची कुठे नियुक्ती?
  • विवेक कमार दक्ष यांची निवड आयसीएमआरमध्ये वरिष्ठ महासंचालक म्हणून झाली आहे.

  • एम. रामचंद्रुडु यांची निवड गृहमंत्रालयात सहसचिव म्हणून केली आहे.

  • पी. प्रवीण सिद्धार्थ यांची नियुक्ती दिल्ली विकास प्राधिकरणात सदस्य म्हणून झाली आहे.

  • अजय कुमार नेमा यांची न्याय विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • डे. सरवनन यांची खादी व ग्रामोद्योग आयोगात वित्तीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • अमित अग्रवाल (IRSE, Civil: 2002) यांची निवड पंचायत राज मंत्रालयात सहसचिव पदासाठी करण्यात आली आहे.

  • पलका साहनी यांचीही नियुक्ती पंचायत राज मंत्रालयात सहसचिव पदासाठी करण्यात आली आहे.

  • जयश्री एम.जी यांची ग्रामीण विकास विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

  • एस.ससीकुमार यांची ग्रामीण विकास विभाग सहसचिव पदी नियुक्ती केली आहे.

  • संदीप रेवाजी राठोड यांची सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

IAS Transfer
Success Story: जिद्द! IAS होण्यासाठी परदेशातील नोकरी धुडकावली; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com