Success Story: जिद्द! IAS होण्यासाठी परदेशातील नोकरी धुडकावली; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

Success Story of IAS Garima Agarwal: आयएएस गरिमा अग्रवाल यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी जर्मनीतील नोकरी धुडकावली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

मेहनत आणि सातत्याने मिळवले यश

एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक

गरिमा अग्रवाल यांनी यूपीएससी परीक्षेसाठी जर्मनीतील नोकरी सोडली

आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. मेहनत आणि सातत्याशिवाय तुम्हाला कोणतेही यश मिळवता येत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करायचे असतात. असंच काहीसं गरिमा अग्रवाल यांनी केलं. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झासा. हिंदी माध्यमातून शिक्षण झाले.त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

Success Story
Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

गरिमा अग्रवाल यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी परदेशातील नोकरीदेखील सोडली. त्यांनी फक्त एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. पहिल्या प्रयत्नात त्या आयपीएस झाल्या. परंतु त्यांची आयएएस होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.

गरिमा अग्रवाल या मूळच्या मध्य प्रदेशच्या खरगोन शहरातील रहिवासी आहे. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर येथून केले. हिंदी माध्यमातून शिक्षण घेऊनही त्या शिक्षणात नेहमी अव्वल होत्या. त्यांना १०वीत ९२ टक्के तर बारावीत ८९ टक्के गुण मिळाले होते.

शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जेईई परीक्षा पास केली. त्यांनी आयआयटीमधून शिक्षण घेतले. त्यांनी इंजिनियरिंग केले. यानंतर त्यांना जर्मनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यांचे स्वप्न काहीतरी वेगळेच होते. त्यांनी इंटर्नशिप न करण्याचा निर्णय घेतला.

गरिमा अग्रवाल यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. दीड वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २०१७ मध्ये २४० रँक प्राप्त केली. यावेळी त्यांची आयपीएस पदावर निवड झाली. परंतु त्यांचे उद्दिष्ट काहीतरी वेगळेच होते. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते.

Success Story
तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

गरिमा यांनी आयपीएसची ट्रेनिंग सुरु असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु ठेवली. त्यांनी २०१८ मध्ये दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांना ४०वी रँक प्राप्त झाली. आयपीएस पदावर निवड झाली असतानाही त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली.आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप जास्त मेहनत केली.

Success Story
Ladki Bahin Yojana : किती लाडक्या बहि‍णींना ₹१५०० चा हप्ता मिळणार? ईकेवायसीनंतर मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com