

मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण क्षेत्रासाठी 3 महत्त्वाचे निर्णय
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना
सोलापूरमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागातील एक आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील दोन अशी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा निर्णय, सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आणि श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता राज्य सरकार चालवणार आहे. महाविद्यालय महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला.
सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आता तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकवले जातील. सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.
राज्य सरकारने आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणी वाढ करण्यात आली आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणी वाढ करण्यात आली आहे. यात आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.