मोठी बातमी! लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रात नवा कायदा; नसरापूर प्रकरणानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर

Maharashtra Government Big Decision : नसरापूर प्रकरणानंतर न्याय आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्याठी महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक गुन्हेगारांना पॅरोल आता दिला जाणार नाहीये.
Maharashtra Government Big Decision :
Public outrage after Nasrapur case pushes Maharashtra government to consider strict no-parole law for sexual offenders.saam tv
Published On
Summary
  • नसरापूर प्रकरणानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये

  • लैंगिक अत्याचार आरोपींना पॅरोल न देण्याचा निर्णय

  • कठोर कायद्याद्वारे गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न

पुण्यातील भोर येथील नसरापूरमध्ये अत्याचार करून चिमुकलीची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी भीमराव कांबळे हा यापूर्वीच लैंगिक अत्याचाराच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपी आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर तो मुक्तपणे फिरत असून त्यामुळेच हा गुन्हा करण्याची हिम्मत झाली,असा आरोप केला जातोय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना यापुढे पॅरोल मिळणार नाही, असा कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्त्वाची निर्णय म्हणजे, आरोपींना पॅरोलबाबत घेण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा करण्यासंदर्भाती निर्देश दिलेत. फडणवीस सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे.

Maharashtra Government Big Decision :
'फाशी नाही ठेचून मारा अन् मला सांगू ही नका', नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

लैंगिक प्रकरणात ८० ते ९० टक्के आरोपी हे त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात. त्या काळात ते परत तेच गुन्हे करतात, असं आकडेवारीवरुन समोर येतंय. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असा कायदा अंमलात आला होता. परंतु दोन ते तीन वर्षानंतर हा कायदा न्यायालयाने रद्द केला होता. आता पुन्हा तसाच कायदा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Maharashtra Government Big Decision :
Maharashtra Politics: महायुती फुटणार, शिवसेना-भाजप वेगळे होणार? संजय शिरसाट यांच्या विधानाने खळबळ

नसरापूर प्रकरणावर सरकारचं लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नसरापूर येथील अत्याचार प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तपासातील गती, गोळा केलेले पुरावे आणि तांत्रिक बाबींबाबत मुख्यमंत्री सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना ते देत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तपासाचे वेळोवेळचे अपडेट्स घेत आहेत.

पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक माहिती उघड

पुण्यातील नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टसमोर आला आहे. यात नराधमाने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबला होता, अशी माहिती उघड झाली आहे. चिमुरडीचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. चार वर्षीय मुलीचा मृत्यू हा ॲस्फिक्सियामुळे होता. मोजा तोंडात कोंबल्यामुळे चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com