40 IAS अधिकाऱ्यांची रातोरात बदली; प्रशासनात मोठी खळबळ, कुणाची कुठे नियुक्ती?

ias transfesr list : प्रशासनातील 40 सनदी अधिकाऱ्यांची रातोरात बदली झाली आहे. अचानक झालेल्या बदल्यांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
UP ias transfer list
ias transfesr listSaam tv
Published On
Summary

प्रशासनात रातोरात ४० अधिकाऱ्यांच्या बदल्या

१५ जिल्ह्यांना मिळाले नवे जिल्हाधिकारी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या जावयाचीही बदली

IAS Transfer List : प्रशासनात रविवारी रात्री मोठे फेरबदल केले आहेत. ४० सनदी अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या करण्यात आल्या आहेत. तर १५ जिह्यात नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे जावई मनीष बन्सल यांचाही समावेश आहे. या बदल्यामुळे उत्तर प्रदेशातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांचे पती मनीष बन्सल यांची आग्रा जिल्ह्याचे अधिकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील पाच महत्त्वाच्या जिल्ह्यात मुख्य विकास अधिकारी, परिवहन आयुक्तासह दोन आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्याचबरोबर प्रधान सचिव, चार विशेष सचिवांच्या स्तरावरही बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात कुणाची नियुक्ती?

श्रावस्ती : अन्नपूर्णा गर्ग

बुलंदशहर : कुमार हर्ष

शामली : आलोक यादव

सहारनपूर : अरविंद कुमार चौहान

फेतेहपूर : निधी गुप्ता

मैनपुरी : इंद्रमणी त्रिपाठी

UP ias transfer list
महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

औरेया : ब्रिजेश कुमार

आग्रा : मनीष बन्सल

झाशी : गौरांग राठी

सुलतानपूर : इंद्रजीत सिंग

अमरोहा : नितीन गौर

हमीरपूर : अभिषक गोयल

रायबरेली : सरनीत कौर ब्रोका

UP ias transfer list
3 IAS आणि 12 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती? वाचा पूर्ण यादी

तत्पूर्वी, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रमुख विभागांवर नव्याने जबाबदारी सोपवली आहे. यात अरविंद मल्लप्पा बंगरी यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नितीश कुमार यांची पॉवर कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष निरंजन यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किंजल सिंग यांची माध्यमिक शिक्षण सचिव तर दुर्गा शक्ती नागपाल यांची देवीपाटन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com