Bullet Train: भारतात धावणार आणखी 3 बुलेट ट्रेन; 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? वाचा सरकारचा मास्टरप्लान

हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बेंगळुरूशी जोडणाऱ्या तीन नव्या बुलेट ट्रेन मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून तेलंगणातील रेल्वे पायाभूत सुविधांनाही मोठी चालना मिळणार आहे.
Bullet Train
Bullet Trainsaam tv
Published On

हैदराबादला जाण्यासाठी आता जर तुम्ही प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही वर्षांत हैदराबादला तीन नवीन बुलेट ट्रेन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ११ जुलै रोजी ही घोषणा केली. या नव्या प्रकल्पांमुळे हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू या प्रमुख शहरांशी हाय-स्पीड बुलेट ट्रेननं जोडलं जाणार आहे.

रेल्वेमंत्र्यांनी काय सांगितलं?

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमध्ये पुणे-हैदराबाद, हैदराबाद-चेन्नई आणि हैदराबाद-बेंगळुरू या तीन मार्गांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही तर संपूर्ण दक्षिण भारताच्या विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे देशातील वाढत्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये हैदराबाद महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे.

हैदराबाद-बेंगळुरू बुलेट ट्रेन

हा मार्ग सुरू झाल्यानंतर हैदराबाद ते बंगळुरू हा प्रवास कमी वेळेत पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रवास अवघ्या २ तास १० मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. सध्या रेल्वेने हेच अंतर पार करण्यासाठी साधारण १२ ते १५ तास लागतात.

Bullet Train
India Hydrogen Train: भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैला धावणार; फक्त ५ रुपयांत करा प्रवास, मार्ग आणि स्थानकं कोणती?

हैदराबाद-चेन्नई बुलेट ट्रेन

हैदराबाद ते चेन्नई बुलेट ट्रेन मार्ग अमरावतीमार्गे जाण्याची शक्यता आहे. या मार्गाची लांबी सुमारे ७६० किलोमीटर असू शकणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्या जवळपास १२ तास लागणारा प्रवास केवळ अडीच तासांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन

पुणे आणि हैदराबाददरम्यानही बुलेट ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रवास २ तास ८ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. सध्या या मार्गावर रेल्वेने प्रवास करण्यासाठी १० तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.

बुलेट ट्रेनचा वेग किती असेल?

या बुलेट ट्रेन मार्गांची रचना ताशी ३५० किलोमीटर इतका वेग लक्षात घेऊन केली जातेय. मात्र ट्रेनचा नियमित धावण्याचा वेग सुमारे ताशी ३२० किलोमीटर असण्याची अपेक्षा आहे. स्टेशनवर थांबे, रेल्वे मार्गावरील वळणं आणि इतर तांत्रिक बाबी लक्षात घेता प्रत्यक्ष सरासरी वेग ताशी २०० ते २५० किलोमीटर इतका राहू शकतो.

Bullet Train
Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

तेलंगणासाठी ५,४०० कोटी रुपयांचा निधी

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने तेलंगणासाठी ५,४०० कोटी रुपयांचा रेल्वे अर्थसंकल्प मंजूर केलाय. राज्यातील रेल्वे व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणारे. यामध्ये रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, हाय-स्पीड रेल्वेसाठी आवश्यक तयारी आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याची कामं केली जाणार आहेत.

हैदराबादमधील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

हैदराबादमधील नामपल्ली, काझीपेट जंक्शन आणि मलकपेट या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम सध्या सुरूये. याशिवाय सिकंदराबाद, बेगमपेट आणि हायटेक सिटी ही स्थानकंही केंद्र सरकारच्या स्थानक आधुनिकीकरण योजनेत समाविष्ट करण्यात आलीयेत. या स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक आधुनिक आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Bullet Train
Vande Bharat : मुंबई अहमदाबाद प्रवास फक्त १ तासात, २०२७ ला सुरु होणार पहिला टप्पा; जाणून घ्या A to Z माहिती

देशातील पहिली बुलेट ट्रेन आधी मुंबई-अहमदाबाद मार्गावर

हैदराबादमधील बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू होण्यापूर्वी देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे मार्गावर धावणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिलीये. नियोजनानुसार, या प्रकल्पाचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ पासून सुरू करण्याचा विचार सरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com