Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

Mumbai Ahmedabad bullet train latest update : देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार असून, या प्रकल्पाचे काम किती टक्के पूर्ण झाले, याबाबतची माहिती खुद्द रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट
Mumbai Ahmedabad bullet train latest updatesaam tv
Published On

अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का देणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प (Mumbai Ahmedabad bullet train Project) लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचं काम वेगाने होत असून, प्रगतीपथावर आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. वैष्णव हे शनिवारी गुजरातच्या अहमदाबाद दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि वेगवेगळ्या विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भातही त्यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पाचं काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.

२०२७ मध्ये म्हणजेच पुढील वर्षी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सूरत-बिलिमोरा सेक्शनवर बुलेट ट्रेन सेवेचा पहिला टप्पा सुरू होईल, असा विश्वासही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वापी-सूरत, अहमदाबाद आणि अखेरीस मुंबईपर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अहमदाबादसह संपूर्ण गुजरातमध्ये वर्ल्डक्लास रेल्वे पायाभूत सुविधा, आधुनिक स्थानके, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, अत्याधुनिक परिवहन सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध होतील. शहरांतर्गत प्रवास सुखकर होईल. आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.

अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासांतर्गत सारंगपूर दिशेने दुसरे प्रवेशद्वार आणि रस्ते विकासावर सहमती झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, स्थानकापर्यंत सहजरित्या पोहोचता येणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट
Mumbai Pune : High-Speed रेल्वेचा ३८० प्रति किमीचा स्पीड, मुंबई ते पुणे प्रवास पूर्ण होणार फक्त ४८ मिनिटात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com