Accident : एसटी बस अन् कारचा भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

KSRTC bus crash near Bengaluru casualties : कर्नाटकातील तुमकुरू रोडवर भरधाव कार आणि केएसआरटीसी बसमध्ये भीषण अपघात होऊन ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी. अतिवेग हे प्राथमिक कारण असल्याची शक्यता.
Accident
Accident
Published On

Bengaluru accident Death Toll updates : भरधाव वेगात असलेली कार अन् बसचा कर्नाटकमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी आहेत. शनिवारी मध्यरात्री तुमकरू रोडवर वेगात असणारी कार डिव्हायडरला धडकली अन् दुसऱ्या लेनवरून जाणाऱ्या एसटी बसवर आदळली. या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा झाला होता. मित्राला भेटायाला कारमधून जाणाऱ्यावर मध्यरात्री काळाने घाला घातला. दरम्यान, या भीषण अपघाताप्रकरणी मदनायकनहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमकुरु रोडवरील जिंदालजवळ कार आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसमध्ये भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमकुरुहून बेंगळुरूकडे जाणारी टाटा इंडिका गाडी रात्री ११.३० वाजता वेगता डिव्हायडरला धडकली. कारचा वेग इतका होती की उलटून विरूद्ध लेनमधून जाणाऱ्या केएसआरटीसी बसला जोरात धडक दिली. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केलं. या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. तर एसटी बसमधील काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.

Accident
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! फक्त याच लाडक्या बहि‍णींना eKYC करता येणार, पाहा नवा बदल

बससोबत झालेली ही धडक इतकी भयंकर होती की कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली. कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. पोलिासंच्या प्राथमिक तपासानुसार, अपघाताचे मुख्य कारण अतिवेग होते. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच मृत्यू झाले. तर गंभीर जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचाराधीच त्याचा मृत्यू झाला. ५ मृतदेहापैकी २ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. उर्वरित ३ जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Accident
Maharashtra Infrastructure : मुंबई-नाशिकचा प्रवास मुंबई-पुण्यासारखा होणार, मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, १० हजार कोटींचा मोठा निर्णय

मृतामध्ये हर्षित आणि लिखित हे दोन मित्र आहेत. हे दोघेही दोड्डाबल्लापूर येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित तीन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेलमंगला सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. हर्षित आणि लिखित दोघेही खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हर्षित रात्री ८.३० च्या सुमारास मित्रांना भेटण्यासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, बसमध्ये ४२ प्रवासी होते. पुढच्या रांगेत बसलेल्या काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर, प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये हलवण्यात आले.

Accident
Gold Rate : सोन्याचा भाव ₹२६०० ने वाढला, चांदीलाही चकाकी, वाचा सुवर्णनगरीतील गोल्डचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com