ऑरगॅनिक-झिरो मैद्याला चाप बसणार? झीरो मैदा विकणं पडणार महागात?

healty food : तुम्ही खात असलेलं अन्न खरंच 'हेल्दी' आहे का?, असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण, देशातील अनेक बड्या फूड ब्रँड्सना 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा'नं नोटीस बजावलीये. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....
health alert update
health alert Saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

हेल्दी, ऑरगॅनिक किंवा झिरो-मैदा... हे शब्द खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर दिसले की आपण डोळे झाकून ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानतो आणि वाट्टेल ती किंमतही मोजतो. मात्र, आता तुमच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन नामांकित ब्रँड्स तुमची दिशाभूल करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

एकीकडे महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनानं अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम राबवली असतानाच, दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा'नंही मोठी कारवाई केलीये.

health alert update
Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

काही कंपन्या आपली उत्पादनं 'झिरो मैदा होल व्हेट ब्रेड' या नावानं विकत असल्याचं 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा'च्या तपासणीत समोर आलंय. तसंच, या ब्रेडमध्ये चक्की फ्रेश पिठासोबत 'व्हीट ग्लूटेन' देखील समाविष्ट आहे. तरीही 'झिरो मैदा' म्हणून याचा प्रचार करणं ग्राहकांना गोंधळात टाकण्यासारखं आहे, असं प्राधिकरणानं म्हटलंय. याशिवाय, कंपनीच्या 'झिरो मैदा पिझ्झा बेस'वरही हरकत घेण्यात आली असून कंपनीकडून नियमांचं उल्लंघन होत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलंय.

health alert update
Jalgaon : रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ, जमिनीवर पडलेला वडापाव पुन्हा विकला, VIDEO व्हायरल

विशेष म्हणजे, बड्या ब्रँड्सकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यानं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आता कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीये. अशातच आता प्राधिकरणानं ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी तब्बल 8 फूड बिजनेस ऑपरेटर्सना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. इतकंच नव्हे तर आता अन्नपदार्थांच्या गुणवत्तेत कसर करणाऱ्या कंपन्यादेखील FSSAIच्या रडारवर आल्या आहेत. त्यामुळे जाहिरातींमधून गुणवत्तेचे दावे करणाऱ्या या बड्या कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com