Jalgaon : रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ, जमिनीवर पडलेला वडापाव पुन्हा विकला, VIDEO व्हायरल

Jalgaon Bhusawal Railway News : भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अस्वच्छ पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई केली. संबंधित स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
BHUSAWAL RAILWAY STATION FOOD SAFETY VIOLATION: RAILWAY ADMINISTRATION TAKES STRICT ACTION AGAINST VENDOR
BHUSAWAL RAILWAY STATION FOOD SAFETY VIOLATION: RAILWAY ADMINISTRATION TAKES STRICT ACTION AGAINST VENDORSaam Tv
Published On
Summary
  • भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री

  • साम टीव्हीच्या वृत्तानंतर रेल्वे प्रशासनाची कारवाई

  • पुढील कारवाई आरपीएफकडे सोपवण्यात आली

  • चौकशीदरम्यान संबंधित स्टॉल तात्पुरता बंद

संजय महाजन, जळगाव

तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करताना फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ विकत घेतात का? मग सावधान! कारण हे अन्न तुमच्या जीवावर बेतू शकते. भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उघड्यावर वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. साम टीव्हीने या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात काही विक्रेते खाली पडलेले खाद्यपदार्थ पुन्हा विक्रीसाठी ठेवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. या प्रकारामुळे हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याशिवाय स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे अवैध विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली यंत्रणा कितपत कार्यरत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

BHUSAWAL RAILWAY STATION FOOD SAFETY VIOLATION: RAILWAY ADMINISTRATION TAKES STRICT ACTION AGAINST VENDOR
Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? IMD नं तारीख सांगितली, मुंबई-पुण्याच्या पावसावरही दिली अपडेट

याप्रकरणी साम टीव्हीने (Saam Tv Bhusawal News) बातमी लावून धरल्यानंतर याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित विक्रेत्याची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई RPFकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

तसेच स्टॉलच्या परवानाधारकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चौकशीदरम्यान गंभीर निष्कर्ष समोर आल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई देखील केली जाऊ शकते, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भुसावळ जंक्शन हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असून येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com