अपघातात पायाला दुखापत झालेल्या महिलेवर पायाऐवजी हृदयाची अँजिओप्लास्टी केल्याचा आरोप
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसंमती न घेता स्टेंट बसवण्यात आला
उपचारानंतर महिलेची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू
संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
एखादा आजार झाला तर सर्वात आधी आपण रुग्णालयात जातो. मात्र तुमचा जर पाय दुखत असेल आणि डॉक्टरांनी तुमच्या हृदयाचं निदान केलं तर?? आश्चर्य वाटलं ना? अशीच एक घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. अपघातात एका भीषण अपघातात महिलेच्या पायाला दुखापत झाली होती. या पायाच्या उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी तिच्या पायावर निदान करण्याऐवजी तिच्या हृदयाचं ऑपरेशन केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली असून डॉक्टरांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली. मृत महिला गुड्डी देवी यांचा एका भीषण अपघातात पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीवर उपचार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या जीटी रोडवरील पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या संमतीशिवाय पायाऐवजी हृदयावर अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. या उपचारानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत महिलेचा मुलगा कुलदीप याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, डॉक्टरांनी कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता हृदयावरील प्रक्रिया केली. तसेच संमतीपत्रावर बनावट सह्या करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरांना हृदयाशी संबंधित समस्या आढळली असती, तर कुटुंबीयांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणासह धमकावल्याचाही आरोप केला आहे. उपचारांबाबत प्रश्न विचारल्यानंतर रुग्णालयाने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उद्धट वर्तन केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेक्टर-२९ पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.