Pune : MHT-CET प्रकरणात नवा ट्विस्ट! प्रवेशासाठी लाखोंची मागणी? ऑडिओ क्लिप व्हायरल

Pune News : VJTI आणि COEP सारख्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी केल्याचा दावा करणारी कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ALLEGED AUDIO CLIP ON VJTI & COEP ADMISSIONS GOES VIRAL, QUESTIONS RAISED OVER ENGINEERING COLLEGE ADMISSION PROCESS
ALLEGED AUDIO CLIP ON VJTI & COEP ADMISSIONS GOES VIRAL, QUESTIONS RAISED OVER ENGINEERING COLLEGE ADMISSION PROCESS Saam tv
Published On
Summary
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

  • कथित संभाषणात VJTI आणि COEPसारख्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा दावा

  • सरकारी टॉप कॉलेजमध्ये प्रवेशासाठी १३ ते १४ लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा

अक्षय बडवे, पुणे

देशभरात सध्या पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातील नामंकित महाविद्यालयांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित इंजिनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची मागणी केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एका क्लास चालकाने विद्यार्थी आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाशी केलेल्या संभाषणाचा दावा करण्यात आला असून, त्यातील संवादामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओमध्ये संबंधित क्लास चालक विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईला नामांकित शासकीय इंजिनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याची तयारी असल्याचे सांगताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये विशेषतः वीजेटीआय (VJTI) आणि सीओईपी (COEP) यांसारख्या प्रतिष्ठित कॉलेजचा उल्लेख करण्यात आला आहे.

ALLEGED AUDIO CLIP ON VJTI & COEP ADMISSIONS GOES VIRAL, QUESTIONS RAISED OVER ENGINEERING COLLEGE ADMISSION PROCESS
Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

संभाषणादरम्यान संबंधित व्यक्ती, "आमची काही परीक्षा केंद्रे आहेत. विद्यार्थ्याने आम्ही सांगू त्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायची आहे. त्याठिकाणी आमची टीम मदत करेल. प्रवेश निश्चित झाल्यानंतरच पैसे द्यायचे आहेत. आधी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही," असे सांगत असल्याचे या कथित ऑडिओमध्ये ऐकू येते. तसेच, "हे आम्ही प्रथमच करत नाही. मागील वर्षीही शेकडो विद्यार्थ्यांना मदत केली आहे," असाही दावा संबंधित व्यक्ती करत असल्याचे सांगितले जात आहे.

याच संभाषणात प्रवेशासाठी लागणाऱ्या पैशांबाबतही चर्चा झाल्याचा दावा आहे. "सरकारी टॉप तीन कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर सुमारे १३ ते १४ लाख रुपये खर्च येऊ शकतो. तुमचे बजेट किती आहे, हे आधी समजणे गरजेचे आहे," असेही संबंधित क्लास चालक पालकाला सांगत असल्याचे कथित क्लिपमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, ठाण्यात कार्यालय असल्याचाही उल्लेख या संवादात करण्यात आला आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काही स्तरांतून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com