Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य
Crime News Saam Tv

Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य

Haryana Crime: हरियाणामध्ये एका ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शेजारी राहणाऱ्या तरुणानेच हे भयंकर कृत्य केले. आरोपीने मुलीचा मृतदेह खड्ड्यात पुरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Published on

Summary -

गुरुग्राममध्ये तीन वर्षांच्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या

शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खड्ड्यात पुरला

पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये संतापजनक घटना घडली. याठिकाणी एका तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. घराजवळ खेळाणाऱ्या मुलीचे अपरहण करून आरोपीने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. आरोपीने या मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवले आणि तिला ४ किलोमीटर अंतरावर नेऊन तिच्यावर आधी बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह खड्ड्यात पुरला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२:१५ वाजताच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला. मुलगी राहत असलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. आरोपी मुलीला घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ज्यामुळे त्याची ओळख पटली. पोलिसांनी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास सेक्टर ३७ औद्योगिक क्षेत्राजवळील एका रिकाम्या जागेतून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी २४ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य
Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मुलीवर बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह खड्ड्यात पुरला. पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह जप्त केला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हरियाणा हादरले आहे.

Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य
Sambhajinagar Crime : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं, आईनेच काढला लेकीचा काटा; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिवनाथ (२४ वर्षे) याला अटक केली आहे. जो मूळचा बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो गुरूग्रामध्ये एका कंपनीत काम करत होता. तो हत्या करण्यात आलेल्या मुलगी आणि तिच्या पालकांसोबत एकाच इमारतीत राहत होता. तो अनेकदा मुलीसोबत खेळायचा. त्याची या मुलीवर वाईट नजर होती. पीडित मुलगी आरोपी ओळखीचा असल्यामुळे विश्वास ठेवत त्याच्यासोबत गेली आणि आरोपीने तिच्यासोबत भयानक कृत्य केले.

Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य
Pune Crime: पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार, धाडधाड करत ३ गोळ्या झाडल्या; नागरिक घाबरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com