Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ

Pune Police: पुण्यामध्ये आईच्या मित्राने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. रस्त्याच्या कडेला कार लावून त्याने हे कृत्य केले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत वारजे पोलिसांनी त्याला अटक केली.
Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ
Pune Crime Saam Tv
Published On

Summary:

  • पुण्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार

  • पीडित मुलीच्या आईच्या मित्राने केले भयंकर कृत्य

  • शाळेत सोडतो सांगत कारमध्ये बसवलं आणि डीपी रोडवर नेलं

  • कारमध्येच आरोपीने पीडितेवर बलात्कार केला

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीवर आईच्या मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेत सोडतो म्हणत पीडित मुलीला आरोपीने कारमध्ये बसले. त्यानंतर शाळेत सोडण्याऐवजी त्याने तिला दुसरीकडे नेलं आणि त्याठिकाणी कारमध्येच तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पुण्यातील प्रसिद्ध डीपी रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी आपल्या ३२ वर्षांच्या विधवा आईसोबत राहते. पुण्यातील वारजे भागात या दोघी राहतात. ज्ञानेश्वर रायरीकर (२९ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा पीडित मुलीच्या आईचा मित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. त्यामुळे पीडित मुलीची देखील ज्ञानेश्वरसोबत ओळख झाली. याच मैत्रीचा फायदा घेत ज्ञानेश्वरने तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. शाळेत सोडतो असे सांगून तो तिला सोबत घेऊन गेला आणि भरसत्यात कारमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ
Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. पीडित महिलेने सांगितले की, ती आणि ज्ञानेश्वर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांची खूप चांगली मैत्री होती. तिचा ज्ञानेश्वरवर विश्वास होता. त्यामुळे ती मुलीला त्याच्यासोबत फिरण्यासाठी पाठवायची. महिलेच्या मुलीने शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वरला बोलवले होते.

Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ
Pune Crime: बायकोच्या छळाला कंटाळला, इमारतीवरून उडी मारत नवऱ्याची आत्महत्या; पुण्यात खळबळ

ज्ञानेश्वरने देखील मी तुला शाळेत सोडतो असे सांगून तिला डीपी रोडवर नेले. पण तिला शाळेत न सोडता त्याने कार डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर कारमध्येच बलात्कार केला. पीडित मुलगी शाळेत सात वाजता पोहचण्याऐवजी साडेसात वाजता पोहचली. ती प्रचंड घाबरली होती. त्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत ज्ञानेश्वरविरोधात तक्रार दाखल केली. वारजे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ
Pune Crime : भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! पीडित तरुणी आरोपींच्या संपर्कात, नेमकं काय प्रकरण? वाचा

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com