भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट
२१ वर्षीय तरुणी आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती
जहीर शेख व आयान शेख हे दोन सख्खे भाऊ आरोपी
सीसीटीव्ही व कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास सुरू
पुण्यातील भिगवणमधील अपहरणाच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आई आणि भावाच्या डोळ्यात लाल मिरची पावडर फेकून २१ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र पोलिसांच्या तपासात पीडित तरुणी आरोपींच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास लग्नाची खरेदी करून पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि आईसोबत दुचाकीवरून घराकडे जात होते. या दरम्यान भिगवण शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून तरुणी, तिची आई आणि भावाच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकून तरुणीचे जबरदस्तीने अपहरण केले. घडलेल्या घटनेबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तपास सुरु केला आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत. तसेच या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यामध्ये दौंड तालुक्यातील जहीर हारुण शेख व आयान हारुण शेख यांच्याविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे. अपहरण आणि चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दरम्यान पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे. हे सर्व तपासामध्ये आढळलं असून आमचा तपास सुरु आहे. आरोपींचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाले आहेत, त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.