

हरियाणात जिम मालकावर गोळीबार
गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
हरियाणाच्या हांसी जिल्ह्यातील फव्वारा चौकात अज्ञात हल्लेखोरांनी जिम मालकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अज्ञाताने जिम मालकावर ५ सेकंदात १० गोळ्या झाडल्याचे समोर आलं आहे. या गोळीबारात जिम मालकाचा जागीच मृत्यू झाला असून या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. जिम मालकाच्या हत्येच्या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड हरि बॉक्सरने ऑडिओ शेअर केलाय. जिम मालक कपिलवर गुरुवारी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. अज्ञाताने जवळून केलेल्या गोळीबारात जिम मालक कपिलचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक व्यायाम करायला आलेली तरुणी देखील जखमी झाली आहे. तरुणीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
फव्वारा चौकाजवळील एका दुकानाजवळ जिम मालक हा तरुण-तरुणींकडून व्यायाम करून घेत होता. त्याचवेळी हल्लेखोर दुचाकीवरुन आले. हेल्मेट घातलेल्या अज्ञात हल्लेखोराने जिम मालकावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गोळीबाराच्या घटनेचा तपास पोलिसांच्या विशेष पथकाने सुरू केला आहे. पोलिसांनी आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात सुरुवात केली आहे. पोलीस आता प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. हल्लेखोरांनी ५ सेकंदात जवळून पाठ आणि डोक्यात गोळीबार केला. या गोळीबारात जिम मालकाचा जागीच मृत्यू झाला.
तत्पूर्वी, अज्ञातांनी जिम मालकावर गोळीबार का केला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी पूर्व वैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. परंतु पोलिसांना अद्याप कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. भर रस्त्यात पहाटे झालेल्या गोळीबाराने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.