

पुण्यात घडली गोळीबाराची घटना
शिरूरच्या करडे घाटात गुन्हेगाराचा गोळाबारात मृत्यू
शिरूरमधील गोळीबाराच्या घटनेने सर्वत्र खळबळ
पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार घडला आहे. पुण्यात आधीच कोमकर विरुद्ध आंदेकर टोळीत संघर्ष पेटला आहे. त्यानंतर आता शिरूरच्या करडे घाटातही गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेने शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गुन्हेगार गटांमधीन जुन्या वादाचे रुपांतर थेट गोळीबारात झाले. गोळीबाराच्या घटनेत सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. कुख्यात गुंडाच्या मृत्यूने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिरूच्या करडे घाट परिसरात दोन गुन्हेगारांचे गट आमनेसामने आले. या दोन्ही गटाचा जुना वाद टोकाला गेला. या वादातून एका गुन्हेगाराने थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाला.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाशिममध्ये दोन गटात राडा
वाशिम शहरालगतच्या काटा रोडवरील एका बारसमोर मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. सुरुवातीला दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर काठ्या, फळ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं. सर्व प्रकार सुरू असताना स्वतः एक पोलीस कर्मचारी तिथं वर्दीत उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या उपस्थितीतच हा राडा सुरू असल्याने आता वाशिम पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.