राज्यात चाललंय काय? मध्यरात्री गोळीबाराचा थरार, महावितरणच्या कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या

Sangli crime news : पुण्यानंतर सांगलीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार घडला आहे. महावितरणच्या कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
Sangli news
Sangli crime news Saam tv
Published On
Summary

सांगलीत मध्यरात्री घडला गोळीबाराचा थरार

महावितरणच्या कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

पोलिसांनी अवघ्या ३ तासांतच आरोपी ताब्यात

पुण्यातील वारजेत एका महिन्यांपूर्वी सलूनमध्ये गोळीबाराचा थरार घडला होता. त्यानंतर आता सांगलीतही गोळीबाराची घटना घडली आहे. सांगलीच्या जतमध्ये एका महावितरणच्या कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सांगलीच्या जममधील संखमध्ये गोळीबाराचा थरार घडला.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संखमध्ये महावितरणच्या वसुली कर्मचाऱ्याची राहत्या घराच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. महावितरण कर्मचाऱ्याच्या मृत्यूने घटनेने संख परिसरात हळहळ व्यक्त केली जातंय. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Sangli news
'अखेरचा प्याला', 'बर्थडे'लाच जावयाला थंड डोक्याने संपवलं; एका चुकीने सासरचे सगळेच अडकले

काय आहे प्रकरण?

संतोषकुमार बिरादार हे काही वर्षांपासून संख येथील महावितरणमध्ये बिलिंग क्षेत्रात काम करत होते. ते संखपासून ४ किलोमीटर अंतरावर अलीकडे पांडोझरी हद्दीत स्वतः पत्नी, एक मुलगा, दोन मुलगी राहत होते. रात्री १.३० सुमारास संतोषकुमार बिरादार हे घरासमोरील व्हरांड्यात पत्नी , दोन मुली एक मुलासोबत झोपले होते.

दोन आरोपींनी झोपलेल्या ठिकाणी संतोषकुमार यांच्या छातीवर गोळीबार करून हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाले. खून करून आरोपी माडग्याळला जाणाऱ्या रोडलगत एका शेतामध्ये लपून बसल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने एक पथक रवाना झाले आणि आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी दोन्ही आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

Sangli news
परभणीत घडलं भयानक हत्याकांड; तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या, नातेवाईकांचा आक्रोश

उदमी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत कोणताही पुरावा उपलब्ध नसताना मुख्य मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. घटनास्थळी उमदी पोलिसांनी पंचनामा करून सांगली शासकीय रुग्णालयात येथे मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संतोषकुमार बिरादार यांच्या मृत्यूने संख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com