Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार का? लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे मोठे संकेत

Om Birla On Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठं विधान केले.
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार का? लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे मोठे संकेत
Gyanesh KumarSaam TV
Published On: 
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची विरोधकांची मागणी

  • लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रस्तावावरील प्रक्रियेबाबत केलं मोठं विधान

  • प्रस्ताव आल्यास नियम आणि संसदीय कार्यपद्धतीनुसार विचार केला जाईल असे ते म्हणाले

  • SIR प्रक्रियेवरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात विरोधक करत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी एक मोठं विधान केले. ओम बिर्ला यांनी सांगितले की, जर विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला तर त्यावर प्रस्थापित नियम आणि कार्यपद्धतीनुसार कारवाई केली जाईल. लोकसभा अध्यक्षांनी हे देखील स्पष्टपणे सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया आहे आणि प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच प्रक्रियेचे पालन केले जाईल.'

भारतात आयोजित होणाऱ्या १२ व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या आधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ओम बिर्ला यांनी हे विधान केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले की, विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवीन महाभियोग प्रस्ताव आणला तर त्याची तपासणी नियम आणि कार्यपद्धतीनुसार केली जाईल. एसआयआर प्रक्रियेवरून ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या विरोधी पक्षांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी हे वक्तव्य आले आहे. एसआयआरअंतर्गत मतदार यादीत केल्या जात असलेल्या बदलांसंदर्भात ज्ञानेश कुमार यांच्या निःपक्षपातीपणावर विरोधी पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार का? लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे मोठे संकेत
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?

ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या मागणीवर स्पष्टपणे सांगितले की, 'विरोधकांना वाटलं तर ते प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी प्रस्ताव आणतील. संसदेला वाटलं तर प्रस्ताव मंजूर होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी आधी प्रस्ताव आणला जातो. संसद त्यावर निर्णय घेते आणि तो प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवला जातो. यासंदर्भात प्रक्रियेनुसार निर्णय होईल.'

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार का? लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे मोठे संकेत
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांचा फैसला सुप्रीम कोर्टात, आज होणार महत्वाची सुनावणी

एसआयआरच्या विरोधात आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि विरोधी पक्षांकडून आंदोलनं सुरू आहेत. विरोधक आणि सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्यावर एसआयआर दरम्यान एकतर्फी आणि मनमानीपणे आपल्या अधिकारांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी विरोधी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी निवडणूक आयुक्तांना संरक्षण देणारा २०२३ चा कायदा रद्द करण्याची मागणी केली.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार का? लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे मोठे संकेत
Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com