Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले

Election Commission Reshuffle: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल झाला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले
Gyanesh KumarSaam Tv
Published On: 
  • निवडणूक आयोगात मोठा प्रशासकीय फेरबदल

  • ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • २०२५ आणि २०२६ मध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • एसआयआर प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगात मोठा बदल झाल्याने चर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. एसआयआरला विरोध केला जातोय आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. याचदरम्यान निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. २०२५ ते २०२६ या काळातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्वाखाली या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यानंतर २० महिन्यांच्या कालावधीत त्यांनी केलेल्या फेरबदलांपैकी हा सर्वात मोठा फेरबदल असल्याचे सांगितले जात आहे. द इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालानुसार, ज्ञानेश कुमारांच्या २० महिन्याच्या काळात मुख्य निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, विशेषतः उप निवडणूक आयुक्त (डीईसी) यांच्या स्तरावर अनेक महत्त्वाचे बदल झाले.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका, दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

द इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण २०२५-२६ या कालावधीत जास्त बदल्या झाल्या आहेत. फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंतः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या २० महिन्यांत सुमारे १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुमारे ३३ महिन्यांच्या कार्यकाळात जवळपास २३ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या कालावधीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचाही समावेश होता.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?

यााधी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सुशील चंद्र यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास २९ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या कालावधीत लोकसभा निवडणुका देखील झाल्या होत्या. अहवालानुसार, लोकसभा निवडणुकांदरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पण २०२५ आणि २०२६ या कालावधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच राहिले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त बदल्या झाल्या आहेत.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा, या राज्य सरकारने थेट ठराव मंजूर केला

दरम्यान, प्रशासकीय सातत्य राखण्यासाठी निवडणूक आयोग साधारणत: मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला कमीत कमी ३ वर्षांसाठी पदावर कायम ठेवले जाते. पण अलीकडच्या ७ बदल्यांमध्ये अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी या पदावर २ वर्षांपेक्षा कमी काळ काम केले आहे. २०२५ मध्ये ८ ते ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर २०२६ मध्ये आतापर्यंत १० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Gyanesh Kumar: मोठी बातमी! निवडणूक आयोगात मोठा फेरबदल, ज्ञानेश कुमारांनी २० CEO बदलले
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांचा फैसला सुप्रीम कोर्टात, आज होणार महत्वाची सुनावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com