गुजरातमध्ये भाजप नेत्याची निर्घृण हत्या, भररस्त्यावर धारधार शस्त्राने वार, राजकीय वर्तुळात खळबळ

Surat crime news : सुरतमध्ये भाजपचे युवा नेते जय दलाल यांची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गुजरातच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
Surat crime news
Surat crime news
Published On

गुजरातमधील सुरतमध्ये सत्ताधारी भाजप नेत्याची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुरतमधील उधना रोड क्रमांक ६ वर रस्त्यावरच भाजपचे युवा नेते जय दलाल यांची धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सूरतमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, मृत तरुण जय दलाल हे सूरतमधील महिला नेत्या जयश्रीबेन दलाल यांचा मुलगा आहे. जयश्रीबेन या लिंबायत मतदारसंघाच्या आमदार संगीताबेन पाटील यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. जयश्रीबेन या आमदार संगीताबेन यांच्यासोबच राजकीय व सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होत्या. मृत जय दलाल हे भाजपमधील सक्रीय कार्यकर्ता होते, त्यांच्याकडे स्थानिक पातळीवर मोठी जबाबदारी होते. ते दिंडोली वॉर्ड युवक आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Surat crime news
Pune Gangwar : पुण्यात पुन्हा गँगवॉर! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची निर्घृण हत्या; बस स्टँडवरच गोळ्या झाडल्या अन् कोयत्याने वार

जय दलाल यांच्या हत्येनंतर सूरतमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. जयश्रीबेन दलाल यांनी मुलाच्या हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, मुलगा दिवसभर घरीच होता. रात्री साडेआठ वाजता तो मित्रांना भेटायला घरातून बाहेर पडला. मध्यरात्री साडेबारा वाजता जय दलाल याची हत्या करण्यात आल्याचे समजले. हल्लेखोरांनी जयला गाडीतून बाहेर ओढून धारदार शस्त्रांनी त्याच्यावर निर्घृणपणे हल्ला केला होता.

गंभीर जखमी झालेल्या जयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. माझ्या मुलावर चक्री आणि पंकज पाटील यांच्यासह सात ते आठ जणांनी हल्ला केला. माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे जयश्रीबेन दलाल म्हणाल्या. दरम्यान, जय दलाल यांच्या या हत्येमागे जुने वैर असल्याचे समोर आले आहे. जयश्रीबेन यांनी आरोप केला आहे की, हल्लेखोरांमध्ये चक्री, पंकज पाटील आणि इतर ७-८ अज्ञात व्यक्तींचा समावेश होता. जय यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती. त्याच रागातून त्यांन जय यांची हत्या केली.

Surat crime news
Modi Meloni Video : पंतप्रधान मोदींनी मेलोनींना दिली 'गोड' भेट; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, 'मेलोडी...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com