Accident News : महामार्गावर भीषण अपघात, बस आणि पेट्रोल टँकरची जोरदार धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू

Gujrat Bus Accident News : राजकोट-अहमदाबाद महामार्गावर संगानी पुलाजवळ दोन बस आणि पेट्रोल टँकरच्या भीषण धडकेत आग लागून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.
GUJARAT HIGHWAY ACCIDENT: TANKER FIRE KILLS 4 NEAR RAJKOT, MANY INJURED
GUJARAT HIGHWAY ACCIDENT: TANKER FIRE KILLS 4 NEAR RAJKOT, MANY INJUREDSaam Tv
Published On
Summary
  • राजकोट-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

  • दोन बस आणि पेट्रोल टँकरची जोरदार धडक

  • टँकरला आग लागून बस जळून खाक

  • ४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

  • बचावकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गुजरातमधून हृदयद्रावक घटना घडली आहे. राजकोट-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात घडून चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोटिला आणि राजकोट दरम्यान संगानी पुलाजवळ दोन बस आणि एका पेट्रोल टँकरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. टँकरला लागलेल्या आगीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास चोटिला आणि राजकोट दरम्यान असलेल्या संगानी पुलाजवळ दोन बस आणि एका पेट्रोल टँकरची जोरदार धडक झाली. अपघातानंतर पेट्रोल टँकरला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच ती भडकली. संपूर्ण बस काही वेळातच जळून खाक झाली. या बसमधील काही प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

GUJARAT HIGHWAY ACCIDENT: TANKER FIRE KILLS 4 NEAR RAJKOT, MANY INJURED
Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

याच दरम्यान, मागून येणाऱ्या मधुरम ट्रॅव्हल्सच्या बसलाही या अपघाताचा फटका बसला. या बसच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी धुराचे मोठे लोट दिसत होते आणि परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि १०८ रुग्णवाहिकांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच, जखमींना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

GUJARAT HIGHWAY ACCIDENT: TANKER FIRE KILLS 4 NEAR RAJKOT, MANY INJURED
Sindhudurg : सिंधुदुर्गात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ने मुसक्या आवळल्या

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com