

गुजरातमध्ये १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
खेळताना चक्कर येऊन खाली कोसळली
हृदयविकाराच्या झटक्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू
गुजरातच्या राजकोटमधील धक्कादायक घटना
गुजरातच्या राजकोटमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. १४ वर्षांच्या मुलीचा खेळताना अचानक मृत्यू झाला. खेळत असताना ही मुलगी अचानक खाली कोसळली आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोटच्या मुलीच्या मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आनंदी मोदी असं या मृत्यू झालेल्या मुलीचं नाव होते. पुरूषोत्तम मास आणि शाळेला सुट्टी असल्यामुळे आनंदी आपल्या मामाच्या घरी राजकोटला आली होती. ती आपल्या कुटुंबीयांसोबत रविवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. जेवण झाल्यानंतर सर्व लहान मुलं खेळण्यासाठी बाहेर गेले. त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं की असं काही घडेल. सतत हसणारी आनंदी सर्वांना सोडून गेली.
खेळता खेळता आनंदीला चक्कर आली आणि ती जमिनीवर पडली. सुरूवातीला सर्वांना वाटलं की तिला फक्त चक्कर आली आहे. पण ती बेशुद्ध पडल्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरू केले. पण उपचार सुरू असताना आनंदीची प्राणज्योत मालवली.
उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आनंदीचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ऐवढ्या कमी वयामध्ये आनंदीचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.