Shreya Maskar
साताऱ्याजवळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेले 'वाई' हे एक ऐतिहासिक शहर आहे. वाईला 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. सातारा येथे रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.
धोम धरण हे टेकड्यांनी वेढलेले एक विशाल आणि निसर्गरम्य जलाशय आहे. धोम धरण येथे बोटिंगचा आनंद घेता येतो. फोटोग्राफी आणि पाण्याच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक सुंदर लोकेशन आहे.
मेणवली घाट हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, कृष्णा नदीच्या शांत व निसर्गरम्य काठावर वसलेला आहे. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
वाईजवळ सिडनी पॉईंट आहे. हे ठिकाण पाचगणीमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवर असलेल्या एका टेकडीवर वसले आहे. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ राजपुरी लेणी आहेत. अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. या लेण्या सुमारे २,००० ते ३,००० वर्षे जुन्या मानल्या जातात.
पांडवगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४१७७ फूट उंच असून तो वाई शहराच्या वायव्येस साधारण ४ मैलांवर, सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेत येतो. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
हॅरिसन्स फॉली हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ, वाई-पंचगनी मार्गावर स्थित एक सुंदर आणि विस्तीर्ण पठार आहे. हे ठिकाण धोम धरण, कृष्णा खोरे आणि आजूबाजूच्या पर्वत रांगांच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.