Bhayandar Tourism : मुंबईजवळील 'मिनी गोवा' पाहिलात का? शहराच्या गोंगाटापासून दूर असलेल्या 'या' पिकनिक स्पॉटवर वीकेंडला जाच

Shreya Maskar

भाईंदर

मुंबईजवळील भाईंदर पश्चिम येथे वेलंकन्नी बीच वसलेला आहे. 'वेलंकन्नी बीच' हा त्याच्या शांत आणि अस्वच्छतेपासून दूर असलेल्या स्वरूपामुळे 'उत्तन व्हर्जिन बीच' म्हणूनही ओळखला जातो.

Bhayandar | google

मुंबईजवळील मिनी गोवा

'वेलंकन्नी बीच' हा मुंबईजवळील 'मिनी गोवा' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे तु्म्ही निसर्गाच्या सानिध्यात निवांत फोटोशूट करू शकता. तसेच येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

The 'Mini Goa' Near Mumbai | google

वेलंकन्नी बीच

डोंगरी येथील उत्तन गावाजवळ वसलेला वेलंकन्नी बीच वीकेंड गेटअवेसाठी बेस्ट लोकेशन आहे. उन्हाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.

Velankanni Beach | google

कसं जाल?

वेस्टर्न लाइन वरून विरार ट्रेन पकडा आणि भाईंदरला उतरा. भाईंदर स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने 'वेलंकन्नी बीच'ला पोहचाल.

Virar | google

भाईंदर जवळील पर्यटन स्थळे

भाईंदरजवळ गोराई बीच, ग्लोबल विपश्यना पॅगोडा, एस्सेल वर्ल्ड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि घोडबंदर किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.

Sanjay Gandhi National Park | google

मुंबईतील हिडन समुद्रकिनारे

मनोरी बीच, आक्सा बीच, एरंगळ बीच, मार्वे बीच, वर्सोवा बीच हे मुंबईतील हिडन समुद्रकिनारे आहेत. सुट्टीत या ठिकाणांनाही भेट द्या.

Aksa Beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : शिवनेरी किल्ल्याचे 'हे' जुने नाव तुम्हाला माहीत आहे का?

Shivneri Fort | saam tv
येथे क्लिक करा...