

सध्याची लाइफस्टाइल खूप बदलली आहे. माणूस सतत डिजीटल उपकरणांचा वापर करत असतो. त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते तर काही वेळेस बराचवेळ आपण त्यामध्ये रमलेले असतो. त्यात मोबाईलचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता कामाच्याही सोयीसुविधा वाढल्यात. कर्मचाऱ्यांना घरबसल्या सगळं काम करता येतंय. यासगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याने भविष्यात तुम्हाला ह्रदयविकाराच्या झटक्यालाही (Heart Attack) सामोरं जावं लागू शकतं.
हार्ट अटॅक हा अचानक येतो असं अनेकांना वाटतं. पण तज्ज्ञांच्या मते शरीर आधीच काही सुचना देत असतं. तुम्ही यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे टेस्ट सुद्धा करू शकता. कारण बदल्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयात बऱ्याच जीवघेण्या समस्येला सामोरं जावं लागतं. पुढे आपण या टेस्ट बद्दल जाणून घेणार आहोत.
तुम्हाला हार्ट अटॅक संबंधीत काही लक्षणं जाणवत असतील तर होमोसिस्टीन (Homocysteine) आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (CRP) या २ महत्वाच्या टेस्ट करू शकता.
होमोसिस्टीन हे शरीरात प्रथिनांच्या पचनादरम्यान तयार होणारे एक अमिनो अॅसिड आहे. व्हिटॅमिन B6, B12 आणि फॉलिक अॅसिडच्या मदतीने ते तुमच्या शरीरातल्या अनेक भागांमध्ये पसरतं. पण शरीरातल्या होमोसिस्टीनची पातळी वाढल्यावर रक्तवाहिन्यांमधल्या भिंतींचं नुकसान होतं. यामुळेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि हार्ट अटॅकची समस्या वाढते.
दुसरी महत्त्वाची चाचणी म्हणजे सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (C-Reactive Protein). रुग्णांना या चाचणीमुळे तुमच्या शरीरातील भागांना किती प्रमाणात सूज आहे हे कळतं. कारण जर तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात सूज असेल तर रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
त्यामुळे CRP चं प्रमाण वाढलेलं असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकच्या समस्येला भविष्यात सामोरं जावं लागू शकतं. या दोन चाचण्यांच्या मदतीने तुम्ही हार्ट अटॅकच्या धोक्यापासून वाचू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.