Amitabh Bachchan : अमिताभ बच्चनला पाहून चाहता बेशुद्ध; 'जलसा' बाहेर उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

Fan Faints During Amitabh Bachchan Sunday Meet At Jalsa : अमिताभ बच्चन यांना पाहताच चाहता बेशुद्ध पडवला. 'जलसा' बंगल्याबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Fan Faints During Amitabh Bachchan Sunday Meet At Jalsa
Amitabh Bachchansaam tv
Published On
Summary

अमिताभ बच्चन रविवारी चाहत्यांना भेटण्यासाठी 'जलसा' बंगल्याबाहेर आले.

अमिताभ बच्चन यांना पाहून एक चाहता बेशुद्ध पडला.

चाहता बेशुद्ध होऊन कोसळल्यामुळे बंगल्याबाहेर गोंधळ उडाला.

चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी कायमच उत्सुक असतात. अनेक कार्यक्रमांना किंवा वाढदिवसानिमित्त कलाकार आपल्या चाहत्यांना घराबाहेर येऊन भेटतात. मात्र महानायक अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी चाहत्यांना भेटतात. अमिताभ बच्चन यांना एक नजर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळे बिग बींना पाहायला रविवारी 'जलसा' बंगल्या बाहेर गर्दी पाहायला मिळते.

काल (रविवारी) मात्र 'जलसा' बंगल्या बाहेर मोठा गोंधळ उडाला. अभिनेत्याला पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत एका चाहत्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना २४ मे रोजी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'बाहेर घडली. प्रचंड गर्दीमुळे या जमावाला नियंत्रित करणे लवकरच कठीण झाले. दर आठवड्याला शेकडो चाहते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर जमतात. त्यांना हात दाखवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि तो क्षण अनुभवण्यासाठी गर्दी करतात. काही चाहते केवळ बिग बींना एक झलक पाहण्यासाठी विविध शहरे आणि राज्यांतून प्रवास करून येतात.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे गर्दीच्या मध्यभागी एका चाहत्याला चक्कर येऊन तो खाली कोसळला, यामुळे परिस्थिती काहीशी चेंगराचेंगरीसारखी झाली आणि घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये एकच घबराट उडाली. अनेक चाहते त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यांनी त्याला पाणी दिले आणि त्याच्याभोवती थोडी मोकळी जागा करून देण्याचा प्रयत्न केला. संबंधित चाहत्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांच्या दर आठवड्याच्या चाहत्यांच्या भेटीदरम्यान गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था यांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर नेटकरी या घटनेवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन सध्या 'कल्की २८९८ एडी' च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. ते सध्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. यानंतर ते रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'सेक्शन ८४' या कोर्टरूम ड्रामामध्ये दिसणार आहेत.

Fan Faints During Amitabh Bachchan Sunday Meet At Jalsa
Deool Band 2 Collection : प्रेक्षक 'स्वामी' भक्तीत तल्लीन! 'देऊळ बंद २'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची चौथ्या दिवशी तगडी कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com