Ahmedabad Serial Blast Case : अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने (हायकोर्ट) मंगळवारी एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. विशेष न्यायालयाने (स्पेशल कोर्ट) दोषींना सुनावलेली शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार, ३८ दहशतवाद्यांची फाशीची सजा कायम ठेवण्यात आली आहे, तर ११ दहशतवाद्यांची जन्मठेप सुनावण्यात आली.
पीडित कुटुंबांना नुकसानभरपाईचे आदेश
दहशतवाद्यांना कोर्टाने शिक्षा कायम ठेवली. साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. वाय. कोगजे आणि समीर दवे यांच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. भारतातील सर्वात भीषण दहशतवादी प्रकरणांपैकी एक असलेल्या या प्रकरणात, ३८ दोषींची फाशीची शिक्षा आणि इतर ११ जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यात आली.
त्याशिवाय हायकोर्टाने या घटनेतील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. स्फोटात प्राण गमावलेल्या ५६ लोकांच्या कुटुंबांना प्रत्येकी १०-१० लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश कोर्टाने दिले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या २०० हून अधिक लोकांना प्रत्येकी १-१ लाख रुपयांची मदत दिली जाईल.
काय घडले होते २६ जुलै २००८ रोजी?
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले होते. अवघ्या ७० मिनिटांच्या आत शहरात २१ वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाले. दहशतवाद्यांनी सायकलवर ठेवलेल्या टिफिन बॉक्समध्ये हे बॉम्ब लपवून ठेवले होते. या भीषण हल्ल्यात ५६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.