Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Pune Nasrapur Rape Case Update : नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात निकाल जाहीर होणार आहे.
PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?saam tv
Published On
Summary
  • नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल

  • आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनवण्याची शक्यता

  • या खटल्यात ८० हून अधिक साक्षीदारांची साक्ष

  • पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्टात १ मे रोजी पुण्यातील नरसापूरमध्ये आजीच्या घरी सुट्टीसाठी आलेल्या एका चिमुकलीवर शेजारीच राहणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळेने बलात्कार करून तिची हत्या केली. पुण्यातील या नरसापूर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून आज जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली असून आज या प्रकरणाचा निकाल पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जाहीर होणार आहे. आता आरोपीला फाशी मिळणार का? त्याच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले होते. या पथकात सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच ऍडव्होकेट अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रकरणाच्या शेवटचा युक्तिवाद शनिवारी केला गेला. यावेळी प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे, वैद्यकीय पुराव्यांचे विश्लेषण, फॉरेन्सिक अहवाल, डीएनए प्रोफाइलिंग मॅट्रिक्स न्यायालयात सादर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल गुरुवारी २५ जून रोजी राखीव ठेवला. १ मे रोजी घडलेल्या या गृहणास्पद घटनेची टाईमलाईन पाहूया...

PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

१ मे ते २ मे दरम्यान काय झालं?

१ मे रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ६५ वर्षीय भीमराव कांबळेने गुन्हा केल्याची कबुली पुणे ग्रामीण पोलिसांना दिली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर २ मे रोजी नसरापूर बंदही पाळण्यात आला.

PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

न्यायालयात आरोपपत्र दाखल

या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या पथकाने वैद्यकीय पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, डीएनए नमुने आणि घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे वेगाने संकलित केले. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

सरकारचे आश्वासन

सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुनावणीला वेग आला. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक विश्लेषण आणि डीएनए प्रोफाइलिंगच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम बाजू मांडली. या खटल्यात ८० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

PUNE NARSAPUR CHILD RAPE AND MURDER CASE VERDICT TODAY | WILL ACCUSED BHIMRAO KAMBLE GET DEATH PENALTY?
Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

आरोपीला फाशीची शिक्षा होणार?

२४ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता आज होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे केवळ पीडित कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाते, याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com