रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Noodles Poisoning Suspected In Greater Noida Family Death Case: ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. नुडल्समध्ये विष मिसळल्याचा संशय असून मालमत्तेच्या वादाच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
Greater Noida Death Case
Greater Noida Death Casesaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री महेश, त्यांची पत्नी ललिता आणि तीन मुलांनी नुडल्स खाल्ले आणि त्यानंतर ते झोपायला गेले. शनिवारी सकाळी त्यांच्या खोलीत पाचही जणांचे मृतदेह आढळले. सुरुवातीला या घटनेमागे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात विषप्रयोगाचा संशय समोर आला आहे.

Greater Noida Death Case
मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, या पाचही जणांचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्याने नव्हे, तर विषप्रयोगामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, महेशनेच नूडल्समध्ये विष मिसळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. महेशच्या मोबाईलमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग आढळले असून, त्यात त्याने आपल्या मृत्यूला दोन बहिणी आणि मेहुण्याला जबाबदार धरल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी महेशच्या दोन बहिणी आणि मेहुण्याला अटक केली आहे.

Greater Noida Death Case
भारत, इटली, फ्रान्स अमेरिका...,8 देशांमध्ये का होतायेत आंदोलनं? नेमकं काय आहे कारण?

मालमत्तेच्या वादातून पाच जणांचा मृत्यू?

रबूपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुजीत उपाध्याय यांनी सांगितले की, नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मृत महेशच्या दोन बहिणी आणि मेहुण्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेच्या वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात विषप्रयोगाचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे मृतांचे व्हिसेरा नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. महेश, त्यांची पत्नी ललिता (वय 35), मुलगी मिष्टी (वय 7) आणि मुलगे लड्डू (वय 11) व साक्षात (वय 3) यांचे मृतदेह शनिवारी सकाळी रबूपुरा परिसरातील नगला श्री पदम गावातील त्यांच्या घरात आढळले होते.

Greater Noida Death Case
Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

पोलिसांच्या प्राथमिक तपासात महेश मानसिक तणाव आणि नैराश्यात असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. याच परिस्थितीत त्याने कुटुंबासह आत्मघातकीचे पाऊल उचलले असावे, असा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण आणि मृत्यूची परिस्थिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Greater Noida Death Case
Yavatmal Blast : वेल्डिंग करताना स्फोट; २ जणांचा मृत्यू, यवतमाळमधील घटनेनं हळहळ

पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंगसह इतर पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे. नोएडाचे एसीपी राजीव सिसोदिया यांनी सांगितले की, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. तपासातून लवकरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com