

१३ ऑक्टोबर रोजी २३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाचा ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा इशारा
मान्सूनचा जोर बऱ्याच अंशी ओसरलाय. परतीच्या काळात देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिलाय. अंदाजानुसार, उद्या म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि पंजाबसह २३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. या काळात ताशी ६० किमी वेगाने जोरदार वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
या वादळाचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तराखंड, बिहार आणि ओडिशामध्ये दिसून येईल. येथील नागरिकांना अत्यंत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. दरम्यान, काही भागांत या वादळामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. तीन राज्यांसाठी हिमवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. यासह पुढील पाच ते सहा दिवसांत दक्षिण राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेच डोंगराळ राज्यांमध्ये दरड कोसळतील असाही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
आग्नेय बंगालच्या उपसागरावर वातावरणाच्या मध्यम थरापर्यंत विस्तारलेले 'चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र' कायम आहे. याच्या प्रभावामुळे १३ ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी होऊ शकते. पश्चिम राजस्थान आणि लगतच्या भागांवर तसेच पश्चिम बंगालवरही चक्रीय वाऱ्यांची अशीच क्षेत्रे अस्तित्वात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी २३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ येईल असा इशारा देण्यात आलाय. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि मिझोराम यांचा समावेश आहे. या काळात ताशी ५५ ते ६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.