Weather Update : महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार! 'या' ६ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणातील सहा जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी. जाणून घ्या हवामान अंदाज.
Maharashtra Weather Update News
Maharashtra Weather Update News AI Image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा प्रभाव

  • कोकणासह ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट

  • उष्ण व दमट हवामानाचा अंदाज

  • नागरिकांनी घ्यावी खबरदारी

महाराष्ट्रात सध्या ऑक्टोबर हीट वाढत आहे. राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका तीव्र झाला असून, वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा तापमानात जाणवणारी वाढ आणि दमट हवामानामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे.

कोकणातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील उन्हाचा ताप कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये उष्णतेसोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra Weather Update News
Tea Tips : चहासोबत चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ! नाहीतर आजारांना मिळेल आमंत्रण

राज्याच्या इतर भागांतही उन्हाचा चटका वाढणार

केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील उर्वरित भागांतही उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपल्यानंतर अनेक भागांत तापमानात वाढ जाणवते. याच काळात वाढणारे तापमान आणि दमट वातावरण यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. याला सामान्यतः ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हटले जाते.

Maharashtra Weather Update News
Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी प्यावे. शक्यतो हलके, सुती आणि सैल कपडे वापरावेत. बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा रुमालाचा वापर करावा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com