Good News: वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CM Vijay Thalapathy Big Decision: तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी आज मोठी घोषणा केली. राज्यातील महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणार त्याचसोबत त्यांना प्रवास देखील मोफत करता येणार आहे.
Good News: महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
CM Vijay Thalapathy Big DecisionSaam tv
Published On
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची मोठी घोषणा

  • महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार

  • तामिळनाडूमध्ये महिलांना मोफत प्रवास करता येणार

  • थलपती विजय यांच्या निर्णयाचे महिलांकडून स्वागत

तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री थलपती विजय नागरिकांच्या फायद्यासाठी एकापाठोपाठ एक मोठ्या घोषणा करत आहेत. त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली असून याचा फायदा राज्यातील महिलांना होणार आहे. राज्यातील महिलांना आता वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत ही मोठी घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी महिलांना मोफेत बस प्रवासाबाबत देखील घोषणा केली. तामिळनाडूमधील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत अनेक नवीन कल्याणकारी योजनांची घोषणा केली. 'अन्नपूर्णी सुपर सिक्स' योजनेअंतर्गत थलपती विजय यांनी घोषणा केली की, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना दरवर्षी ३ मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील. ही योजना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पोंगलच्या मुहूर्तावर सुरू केली जाईल. या योजनेअंतर्गत सिलिंडर खरेदीवर खर्च केलेली रक्कम सरकार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल.

Good News: महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Good News: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन खरेदी करा खत, केंद्र सरकारने दिलं मोठं गिफ्ट

'अन्नपूर्णी सुपर सिक्स' या योजनेमुळे अंदाजे १.३ कोटी कुटुंबांना फायदा होण्याचा अंदाज आहे. थलपती विजय सरकार या योजनेवर दरवर्षी अंदाजे ४,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत सांगितले की, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे लोकांवरील आर्थिक भार वाढला आहे. अशा परिस्थितीत सरकार हा दिलासादायक निर्णय घेऊन जनतेला दिलेले वचन पूर्ण करत आहे.

Good News: महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Good News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग 'या' दिवशी होणार सुरू

थलपती विजय सरकारने महिलांसाठीच्या 'वेट्री पयानम' योजनेची देखील व्याप्ती वाढवली आहे. तामिळनाडूमधील महिलांना प्रवास मोफत करता येत आहे. आता फक्त सामान्य बसमधूनच नाही तर एक्स्प्रेस, एलएसएस, डिलक्स आणि आंतर जिल्हा सरकारी बसमधूनही महिलांना मोफत प्रवास करायची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

Good News: महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Good News: प्रत्येक आमदाराला कार आणि महिन्याला 100000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com