Good News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग 'या' दिवशी होणार सुरू

Panvel-Karjat Railway Line: पनवेल आणि कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचा प्रवास सुसाट होणार आहे. नवा रेल्वे मार्ग लवकरच त्यांच्या सेवेत येणार आहे.
Good News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग 'या' दिवशी होणार सुरू
Panvel-Karjat Railway LineSaam Tv
Published On
  • कर्जत पनवेल नवीन रेल्वेमार्ग ऑक्टोबर २०२७ पर्यंत सुरू होणार

  • कर्जत- पनवेल रेल्वेमार्गाचे ९० टक्के काम पूर्ण

  • कर्जतवरून प्रवाशांना थेट पनवेल गाठता येणार

  • नवी मुंबई, ठाणे आणि कर्जतमधील प्रवाशांना होणार फायदा

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता थेट पनवेलवरून कर्जत आणि कर्जत ते पनवेल असा प्रवास करता येणार आहे. कारण कर्जत ते पनवेल हा नवा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ऑक्टोबर २०२७ पर्यंत हा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा हा प्रवास सुसाट आणि सोपा होणार आहे.

बहुप्रतिक्षित कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ऑक्टोबर २०२७ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. ​खासदार श्रीरंग बारणे कर्जत पनवेल लोकल सेवा व्हावी या दृष्टीने रेल्वे मंत्र्यांशी अनेकदा भेट आणि चर्चा केलेली आहे. कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे.

Good News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग 'या' दिवशी होणार सुरू
Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?

कर्जत-पनवेल या मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२७ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ​हा मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या संपूर्ण परिसरातील प्रवाशांचा प्रवास अत्यंत सोपा आणि गतीमान होणार आहे. हा मार्ग कधीपर्यंत सुरू होईल याची तारीख जरी समोर आली नसली तरी ऑक्टोबर २०२७ पर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Good News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग 'या' दिवशी होणार सुरू
Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com