Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?

Hydrogen Train Start From Today: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू झाली. ही ट्रेन कुठून कुठे धावणार आणि तिकीट किती ते घ्या जाणून...
Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?
Hydrogen TrainSaam Tv
Published On
  • भारतातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू

  • पीएम मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

  • जिंद- सोनीपत मार्गावर हे ट्रेन धावणार आहे

  • १० डब्यांच्या या ट्रेनमध्ये सुमारे २,६०० प्रवासी प्रवास करू शकतात

देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने हरित आणि आधुनिक वाहतुकीच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलून इतिहास रचला आहे. भारतात पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन आजपासून प्रवाशांच्या सेवेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकावर पीएम मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे हायड्रोजन तंत्रज्ञानावर प्रवासी गाड्या धावणाऱ्या निवडक देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही ट्रेन जिंद आणि सोनीपत दरम्यान सुमारे ८९ किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होणार आहे.

पहिली पर्यावरणपूरक ट्रेन -

हायड्रोजन ट्रेन हा भारतीय रेल्वेच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालते ज्यामुळे डिझेलची गरज भासत नाही आणि केवळ वाफ आणि उष्णता निर्माण होते. यामुळे कार्बन उत्सर्जन जवळजवळ शून्य होते. ज्यामुळे ही ट्रेन अत्यंत पर्यावरणपूरक ठरते. महत्वाचे म्हणजे या हायड्रोजन ट्रेनमधून प्रवास करताना भारतामध्ये धावणारा इतर ट्रेनमध्ये प्रवास करताना जसे वाटते तसाच अनुभव येईल.

Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?
Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

जबरदस्त इंजिन आणि उत्कृष्ट कामगिरी -

नवीन हायड्रोजन ट्रेनमध्ये ३,२०० हॉर्सपॉवरची शक्तिशाली इंजिन प्रणाली आहे. तिचा सामान्य परिचालन वेग ताशी ७५ किलोमीटर आहे जो गरजेनुसार ताशी ११० किलोमीटरपर्यंत वाढवता येतो. या १० डब्यांच्या ट्रेनमध्ये एकाच वेळी अंदाजे २,६०० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या २ ते ४ डब्यांच्या हायड्रोजन ट्रेन्स चालवल्या जातात. तर भारताने १० डब्यांची ट्रेनसेट विकसित करून एक नवीन पायंडा पाडला आहे.

Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?
Bullet Train: भारतात धावणार आणखी 3 बुलेट ट्रेन; 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? वाचा सरकारचा मास्टरप्लान

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान -

भारतीय रेल्वेने या ट्रेनमध्ये प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. ही ट्रेन अत्याधुनिक हायड्रोजन गळती शोधक, ज्वाला शोधक आणि स्वयंचलित बंद प्रणालीने सुसज्ज आहे. संचालनादरम्यान कोणतीही असामान्यता आढळल्यास ही प्रणाली तात्काळ हायड्रोजनचा पुरवठा बंद करून प्रवाशांची सुरक्षिततेवर भर देते.

Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?
Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

भाडे फक्त ५ रुपयांपासून सुरू -

रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशाला लक्षात ठेवून या ट्रेनचे भाडे खूप कमी ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रेनमधून प्रवासाचे किमान भाडे फक्त ५ रुपये आणि कमाल भाडे २५ रुपये असेल. ट्रेन क्रमांक 74010 जिंदहून सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि सोनीपतला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 74009 सोनीपतहून सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि जिंदला दुपारी १ वाजता पोहोचेल.

Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?
Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com