

इंग्लंड दौऱ्यात भारतीय टी-20 टीम निराशाजनक कामगिरी कायम राहिली. टीम इंडियाचा बेलफास्टमध्ये सुरू झालेला पराभवाचा सिलसिला ब्रिस्टलमध्येही थांबला नाही. चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल 9 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवासह भारताने सलग दुसरी टी-२० सिरीज गमावली आहे.
यापूर्वी आयर्लंडविरुद्धची टी-20 सिरीज भारताने 2-0 ने गमावली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया कमबॅक करेल अशी अपेक्षा होती. मात्र हे चित्र बदललं दिसलं नाही. आयर्लंडने भारताविरुद्ध इतिहासात प्रथमच टी-20 सिरीज जिंकली आणि आता इंग्लंडनेही तीच कामगिरी केली. विशेष म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये इंग्लंडने भारताला पहिल्यांदाच पराभूत केलंय.
भारतीय टी-20 टीमचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर अजून कर्णधार म्हणून पहिल्या विजयाची अजूनही प्रतीक्षा आहे. ब्रिस्टलमधील काउंटी ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 158 रन्स केले होते. मात्र हा स्कोर डिफेंड करण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने केवळ 13.5 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य गाठत सामना एकतर्फी जिंकला.
या सामन्यात श्रेयस अय्यरचा एक निर्णय भारतासाठी महागात पडल्याचं दिसून आलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अर्शदीप सिंगने जोस बटलरला अवघ्या 13 रन्सवर बाद केलं. त्यानंतर अर्शदीपकडून सलग ओव्हर टाकून घेण्याऐवजी अय्यरने गोलंदाजीत बदल केला.
याचा इंग्लंडने पुरेपूर फायदा घेतला. हॅरी ब्रूक आणि फिल सॉल्ट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेने कमी अनुभव असलेल्या प्रिन्स यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या गोलंदाजीवर मोठी फटकेबाजी केली. त्यामुळे पॉवरप्ले संपेपर्यंत इंग्लंडने एका विकेटच्या मोबदल्यात 62 रन्स केले. याच टप्प्यावर सामना भारताच्या हातातून निसटला.
सामन्यानंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "पुन्हा एकदा पराभव झाल्यामुळे निराशा झाली आहे. 158 रन्सचा स्कोर या विकेटवर पुरेसा नव्हता. इंग्लंडने किती वेगाने लक्ष्य गाठलं, हे सर्वांनी पाहिलं.
तो म्हणाला, "मी गोलंदाजांना शक्य तितक्या वेळा एकाच लेंथवर चेंडू टाकायला सांगितलं होतं. कारण त्या भागातून मोठे फटकं मारणं सोपं नव्हतं. पण आमच्याकडून नियोजनाची अंमलबजावणी तितकी चांगली झाली नाही. काही वेळा आम्ही वेग बदलण्याचा किंवा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सुटलेले चेंडू इंग्लंडच्या फलंदाजांनी बाऊंड्रीलाईनच्या बाहेर पाठवले."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.