FIFA World Cup : विजय मिळाल्यानंतर एक चूक पडली महागात; इंग्लंडच्या खेळाडूचा हात फ्रॅक्चर, क्वार्टर फायनलला मुकणार, VIDEO

Jordan Henderson Fractured arm England FIFA world cup : इंग्लंडने राउंड ऑफ १६ मध्ये यजमान मेक्सिकोला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचा पुढील सामना नॉर्वेसोबत होणार आहे. मात्र, जॉर्डन हेंडरसन या सामन्यात खेळू शकणार नाही. इतकेच नाही तर, स्पर्धेतील पुढील सामन्यांतही खेळण्याची शक्यता कमी आहे.
विजयी जल्लोष करताना एक चूक नडली, खेळाडूचा हात मोडला
England midfielder Jordan Henderson fractured his arm while celebratingsaam tv
Published On

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या आणि धडधड वाढवणाऱ्या फीफा वर्ल्डकप स्पर्धेत हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. विजयाचा जल्लोष करताना खेळाडूच्या हातून एक चूक घडली. उडी मारताना तो मैदानात आपटला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. इंग्लंड आणि यजमान मेक्सिको यांच्यातील सामना संपल्यानंतर विजयी जल्लोष करताना ही दुर्घटना घडली. आता हा खेळाडू पुढच्या सामन्याला देखील मुकणार आहे.

इंग्लंडच्या संघाची सुरुवात साजेशी झाली नसली तरी त्यानंतर हॅरी केनच्या नेतृत्वात या संघानं कामगिरी उंचावून झोकात क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. त्यांचा सामना नॉर्वेसोबत भिडणार आहे. या महत्वाच्या सामन्यात अनुभवी मिडफिल्डर जॉर्डन हेंडरसन हा खेळू शकणार नाही. त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. राउंड ऑफ १६ मध्ये इंग्लंडच्या विजयाचा जल्लोष करताना एक चूक त्याला महागात पडली.

फीफा वर्ल्डकपच्या राउंड ऑफ १६ मध्ये इंग्लंडची लढत यजमान मेक्सिकोविरुद्ध झाली होती. या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने ३-२ ने विजय मिळवून क्वार्टर फायनलमध्ये झोकात एन्ट्री केली. इंग्लंडसाठी हा विजय अत्यंत महत्वाचा होता. विजेतेपदाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल होते. त्यामुळे जल्लोष करणे सहाजिकच होते. सर्व खेळाडू आपल्या चाहत्यांसोबत जल्लोष करण्यासाठी गेले. पण उत्साहाच्या भरात मारलेली उडी जॉर्डनला भोवली.

मॅच संपल्यानंतर इंग्लंडचे काही खेळाडू मैदान सोडून चाहत्यांकडे गेले. बराच वेळ चाहत्यांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर खेळाडू पुन्हा मैदानात जात होते. त्यावेळी डिजिटल बोर्डच्या वरून उडी मारण्याच्या प्रयत्नात जॉर्डन खाली पडला. त्याचा हात पूर्ण पिरगळला. वेदनेने तो विव्हळत होता. या घटनेनंतर सगळे खेळाडू तिथे जमा झाले. मेडिकल टीम आली. त्यांनी तपासणी केली. त्यानंतर जॉर्डनला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

महत्वाच्या सामन्याला मुकला

मेक्सिको सिटी हॉस्पिटलमध्ये जॉर्डनवर उपचार झाले. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया झाली. ती यशस्वी झाली आहे. हॉस्पिटलच्या बेडवरून त्यानं सोशल मीडियावर फोटोसह पोस्ट शेअर केली आहे. याबाबत त्यानं माहितीही दिली. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफचेही त्याने आभार मानले. सध्या तो अमेरिकेत परतला असून, तिथे कॅन्सस सिटीमध्ये इंग्लंड टीमच्या कॅम्पमध्ये आहे. क्वार्टर फायनलमध्ये खेळणार नसून, सेमिफायनलमध्येही खेळण्याची शक्यता धुसर आहे.

विजयी जल्लोष करताना एक चूक नडली, खेळाडूचा हात मोडला
FIFA World Cup 2026: इजिप्त आघाडीवर, मेस्सीची पेनल्टीही हुकली; 13 मिनिटांत पालटलं चित्र, वाचा अर्जेंटिनाने कसा जिंकला हरलेला सामना?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com