Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

Mumbai To Bengaluru Vande Bharat Sleeper Train Details: मुंबई ते बंगळुरू दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सेवेत येणार आहे. 180 किमी वेग, 16 डबे, आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Vande Bharat Sleeper train stationed in Bengaluru during final testing phase before launch.
Vande Bharat Sleeper train stationed in Bengaluru during final testing phase before launch.saam tv
Published On

देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर त्रेम (मुंबई-बेंगळूर वंदे भारत स्लीपर ट्रेन) बेंगळूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि केएसआर बेंगळूर रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान ओव्हरनाइट (रात्रभर धावणारी) ट्रेन ठरणार आहे. आता या ट्रेनचा अंतिम चाचणी टप्पा बेंगळूर स्थानकावर पार पडणार असून त्यानंतर प्रवाशांसाठी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

अंतिम चाचणीसाठी ट्रेन दाखल

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (BEML) यांनी चेन्नईतील इंटीगेल कोच फॅक्टरी (ICF) च्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही ट्रेन तयार केली आहे. ग्रे आणि ऑरेंज रंगातील ही ट्रेन सर्व आवश्यक मंजूरी मिळल्यानंतर सेवेत दाखल होणार आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार असून प्रवाशांना प्रीमियम आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होईल. हुबळी-धारवाड, बेळगाव आणि पुणे येथून प्रवास करणाऱ्यांना या स्लिपर ट्रेनमुळे मोठा फायदा होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे महिन्यात ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण होऊन आवश्यक मंजूरी मिळल्यानंतरच ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई-बेंगळुरू दरम्यान दुसरी वंदे भारत ट्रेन

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी 2026 मध्ये हावडा ते कामाख्या या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्या ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास वेळेत तब्बल सहा तासांची बचत झाली होती. त्याचप्रमाणे मुंबई आणि बेंगळुरू दरम्यानही प्रवास वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या ही ट्रेन अद्याप साउदर्न रेल्वे किंवा भारतीय रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली नाही. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच ती अधिकृतपणे समाविष्ट केली जाईल. सध्या ही ट्रेन चाचणीसाठी बेंगळुरूमध्ये ठेवण्यात आली आहे.

Vande Bharat Sleeper train stationed in Bengaluru during final testing phase before launch.
Vande Bharat Express : देशातल्या सर्वात सुंदर वंदे भारत रेल्वे प्रवास! आयुष्यात एकदातरी अनुभवायलाच हवेत हे ८ निसर्गरम्य मार्ग

काय आहेत वैशिष्ट्ये?

मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण 16 डबे आहेत. या ट्रेनमध्ये 823 प्रवाशांची बसण्याची/झोपण्याची क्षमता आहे. यात 11 एसी 3-टियर (3AC) डबे (611 बर्थ), 4 एसी 2-टियर (2AC) डबे (188 बर्थ) आणि 1 फर्स्ट एसी (1AC) डबा समाविष्ट आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते. विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी डबे आरामदायी बनवण्यात आले असून हालचाल, कंपन आणि आवाज कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना शांत आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली आणि आपत्कालीन परिस्थितीत ‘टॉक-बॅक’ सुविधा देण्यात आली आहे.

Vande Bharat Sleeper train stationed in Bengaluru during final testing phase before launch.
Vande bharat sleeper train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपरचा लूक आला समोर, व्हिडीओ पाहून म्हणाल ट्रेन की फाईव्ह स्टार हॉटेल

मुंबई-बेंगळुरू प्रवाशांना मोठा फायदा

वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील नवीन एसी डबे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या ट्रेनमधील सुविधा चालत्या-फिरत्या लक्झरी हॉटेलप्रमाणे असतील. डब्यांमध्ये आधुनिक टॉयलेट्स, डिजिटल पॅसेंजर माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पूर्णतः वातानुकूलनाची सोय असेल. मुंबई-बेंगळुरू रेल्वे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. ही ट्रेन व्यावसायिक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा उत्तम पर्याय ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com