Sakshi Sunil Jadhav
वेगवान प्रवासासोबतच खिडकीतून दिसणारं अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल, तर भारतातल्या काही Vande Bharat Express चे मार्ग तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरचा प्रवास समुद्रकिनारे, हिरवे डोंगर आणि असंख्य बोगद्यांमुळे अविस्मरणीय ठरतो. पावसाळ्यात या मार्गाचे सौंदर्य अनेक पटींनी खुलून दिसते.
हिमालयाच्या कुशीतून जाणारा हा मार्ग बर्फाळ पर्वत आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य दाखवतो. भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी हा एक मानला जातो.
बॅकवॉटर, नारळांची झाडे आणि अरबी समुद्राचे सुंदर दृश्य या मार्गाची खासियत आहे. निसर्गप्रेमींसाठी हा प्रवास खास अनुभव देणारा आहे.
चहाचे मळे, नद्या आणि घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग डोळ्यांचं पारणं फेडतो. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले निसर्गसौंदर्य प्रवास जास्त खास बनवतो.
शिवालिक पर्वतरांगा आणि हिरवाईने नटलेला परिसर या मार्गावर पाहायला मिळतात. उत्तर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वंदे भारत मार्गांपैकी हा एक आहे.
गंगा किनाऱ्यावरचा सांस्कृतिक वारसा आणि उत्तर भारतातले बदलणारे भूभाग या प्रवासात अनुभवता येतात. धार्मिक आणि आधुनिक भारताचा सुंदर संगम इथे दिसतो.
तामिळनाडू आणि कर्नाटकातली हिरवळ, शेती आणि ऐतिहासिक शहरांचा प्रवास या मार्गावर अनुभवता येतो. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
विदर्भ आणि छत्तीसगडमधील हिरवीगार जंगले आणि नैसर्गिक परिसर या मार्गाचे आकर्षण आहेत. शांत आणि निसर्गरम्य रेल्वे प्रवासाचा आनंद ईथे घेता येतो.