Sakshi Sunil Jadhav
रक्तातली साखर वाढल्यामुळे शरीरातल्या पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे वारंवार पाणी प्यायची इच्छा होते आणि तोंड कोरडे पडते.
जास्त साखर बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त करावं लागतं. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीही वारंवार लघवीला जावे लागू शकते.
पुरेसे जेवल्यानंतरही वारंवार भूक लागते. कारण शरीरातल्या पेशींना ग्लुकोजचा योग्य वापर करता येत नाही.
शरीराला आवश्यक ऊर्जा न मिळाल्याने अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. दैनंदिन कामे करतानाही ऊर्जा कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रक्तातली साखर वाढल्याने डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होतो. त्यामुळे काही काळासाठी दृष्टी धूसर होऊ शकते.
त्वचा कोरडी पडणे, खाज येणे किंवा जखमा लवकप न भरणे ही लक्षणे दिसू शकतात. मान किंवा काखेत काळे डाग दिसल्यासही तपासणी करणे गरजेचे आहे.
रक्तातली साखर वाढल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्वचा, किडनी किंवा बुरशीजन्य संसर्ग वारंवार होऊ शकतात.
कोणताही प्रयत्न न करता वजन झपाट्याने कमी होत असेल तर ते धोक्याचे लक्षण ठरू शकते. अशावेळी त्वरित रक्तातल्या साखरेची तपासणी करावी.
हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.