Badlapur Hidden Waterfalls: कोंडेश्वर ते नाणेघाट... बदलापूरजवळचे ८ अप्रतिम धबधबे; गर्दीपासून दूर निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या

Sakshi Sunil Jadhav

कोंडेश्वर धबधबा

कोंडेश्वर मंदिराच्या परिसरात असलेला हा धबधबा बदलापूरपासून सर्वात जवळच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात तुम्हाला इथे हिरवागार निसर्ग, थंडगार वातावरण आणि धबधब्याचा मनमोहक नजारा पर्यटकांना आकर्षित करतो.

Kondeshwar Waterfall

बारवी धरण परिसरातील धबधबे

बारवी धरणाच्या आसपास पावसाळ्यात बरेच छोटे नैसर्गिक धबधबे तयार होतात. शांत वातावरण, दाट जंगल आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे हा परिसर फोटोग्राफी आणि पिकनिकसाठी बेस्ट मानला जातो.

Waterfalls in the Barvi Dam area

भिवपुरी धबधबा

कर्जतजवळचा भिवपुरी धबधबा ट्रेकर्स आणि साहसी पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. रेल्वेने सहज पोहोचता येत असल्याने वीकेंडला येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

Weekend Trip Near Mumbai

पळसदरी धबधबा

पळसदरी गावाजवळील हा धबधबा कमी गर्दीचा असल्यामुळे शांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे. छोटा ट्रेक केल्यानंतर दिसणारा धबधबा आणि आजूबाजूची हिरवाई मनाला प्रसन्न करते.

Weekend Trip Near Mumbai

झेनिथ धबधबा

खोपोलीजवळील झेनिथ धबधबा पावसाळ्यात प्रचंड जलप्रवाहामुळे जास्त आकर्षक दिसतो. साहसी भटकंतीची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण लोकप्रिय असले तरी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.

Weekend Trip Near Mumbai

रंधा धबधबा

भंडारदरा परिसरातील रंधा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक मानला जातो. पावसाळ्यात धबधब्याचा प्रचंड वेग आणि धुक्याने भरलेले वातावरण पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देते.

Weekend Trip Near Mumbai

माळशेज घाटातील धबधबे

माळशेज घाटातून प्रवास करताना रस्त्यालगत अनेक हंगामी धबधबे पाहायला मिळतात. ढगांनी वेढलेले डोंगर, धुके आणि हिरवीगार दरी यामुळे हा परिसर पावसाळी पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो.

Nature Tourism

नाणेघाट धबधबा

इतिहासप्रसिद्ध नाणेघाट परिसरात पावसाळ्यात अनेक लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. ट्रेकिंग, निसर्गभ्रमंती आणि सह्याद्रीचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती ठरते.

Nature Tourism

NEXT: दररोज अंडी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? लगेचच वाचा महत्त्वाची माहिती

cholesterol facts
येथे क्लिक करा