Sakshi Sunil Jadhav
अंडी हा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. पण डॉक्टरांच्या मते बऱ्याच निरोगी व्यक्तींसाठई दररोज एक अंडी खाणे सुरक्षित असून ते संतुलित आहाराचा भाग असू शकते. जाणून घ्या दररोज अंडी खाल्ल्याने होणारे फायदे.
एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम हाय प्रोटीन असतं. याचा फायदा स्नायूंची वाढ, दुरुस्ती आणि शरीराच्या ऊती निरोगी ठेवण्यासाठी होतो.
अंड्यातले कोलीन (Choline) हे पोषक तत्त्व स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते. अनेक लोकांच्या आहारात या घटकाची कमतरता असते.
अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन आणि झिएक्सॅन्थिन हे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे डोळ्यांचं आरोग्य जपण्यास आणि वयानुसार होणाऱ्या दृष्टीच्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
अंड्यामधले व्हिटॅमिन D शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतं. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास, विशेषतः वयोवृद्धांमध्ये, फायदा होतो.
अंड्यातील प्रथिनांमुळे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
निरोगी व्यक्तींमध्ये दररोज एक अंड खाल्ल्याने हार्ट अटॅक वाढत नाही, असे अनेक अभ्यासांमध्ये आढळले आहे. शरीर लिव्हरमार्फत कोलेस्ट्रॉलचे उत्पादन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करते.
ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा हृदयविकाराचा धोका आहे त्यांनी अंड्यांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
उकडलेले, वाफवलेले किंवा कमी तेलात बनवलेले अंडे अधिक आरोग्यदायी मानले जाते. जास्त बटर, चीज किंवा प्रक्रिया केलेल्या मांसासोबत अंडे खाल्ल्यास त्याचे फायदे कमी होऊ शकतात.
अंड्यासोबत फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, पनीर किंवा टोफू यांचाही आहारात समावेश करा. फक्त अंड्यावर अवलंबून न राहता संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेणे जास्त फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.