Gas war : आता जगात गॅस वॉर, इराणचे गॅस डेपो इस्रायलच्या टार्गेटवर

Iran Israel conflict : इराण-इस्रायल संघर्ष आता गॅस युद्धात परिवर्तित होत असून साऊथ पार्स गॅस क्षेत्रावरील हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. कतार, सौदी अरेबिया आणि इतर देशांवरील परिणामासह संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा.
Gas War
Gas WarSaam TV Marathi
Published On

Iran Israel gas war impact on global energy : इराण-इस्रायल युद्ध आता चांगलचं पेटलयं. इस्रायलनं इराणच्या गॅस डेपोवर केलेल्या हल्ल्यामुळे जग आता गॅस वॉरच्या दिशेने निघालयं. त्यामुळे इराणनं इस्रायलला कसं प्रत्युत्तर दिलयं. पाहूयात या विशेष रिपोर्टमधून...

मध्य पूर्वेतील संघर्ष आता विनाशकारी वळणावर येऊन पोहचलाय. इराण आणि इस्रायल युद्धात आता सर्वाधिक लक्ष्य केलं जातयं ते तेलसाठे आणि गॅस डेपोंना. इस्रायलनं इराणच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या अशा साऊथ पार्स गॅस डेपोवर विध्वंसक हल्ला केला. (Iran Israel war latest news)

साऊथ पार्स जगातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅस डेपो आहे... 9 हजार 700 स्क्वेअर किमी परिसरात गॅसचा साठा आहे... हा साठा जगाची पुढच्या 13 वर्षाची गरज पूर्ण करू शकतो...इराणच्या एकूण गॅस उत्पादनापैकी 75 टक्के उत्पादन याचं ठिकाणी होते. इराणची 80% वीज निर्मिती 'साऊथ पार्स'वर अवलंबून आहे.

Gas War
Raj Thackeray : शाळा-कॉलेजात ड्रग्ज पोहोचलं, लहान मुलं पळवली जात आहेत; गृहमंत्री काय करतायत? राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

दरम्यान साऊथ पार्सवरील हल्ल्यानंतर अमेरिकेनं हात झटकून इस्रायललाच हल्ल्यासाठी जबाबदार ठरवलयं...साऊथ पार्सवरील हल्ला इस्रायलचं ऑपरेशन असल्याचं सांगत, या हल्ल्याबद्दल काहीही माहिती नव्हती, असं विधान ट्रम्प यांनी केलयं..मात्र साऊथ पार्सवरील हल्ल्यानंतर चवताळलेल्या इराणनं UAE आणि सौदी अरेबियामधील गॅस आणि तेल साठ्यांवर स्ट्राईक सुरु केलीय.

Gas War
आता ATM मधून मिळणार गॅस, रिकामं सिलेंडर आणा आणि भरून घ्या, वाचा नेमकं सत्य

इराणने कतारमधील रास लफान औद्योगिक शहरातील LNG एक्सपोर्ट सेंटरवर हल्ला केलाय...हे जगातील सर्वात मोठे एलएनजी एक्सपोर्ट प्रकल्प आहे. रास लफानमधून दरवर्षी अंदाजे 77 ते 80 दशलक्ष टन एलएनजीची निर्यात केली जाते. जागतिक एलएनजी व्यापारात याचा वाटा अंदाजे 20% आहे, इथून प्रामुख्याने आशिया आणि युरोपला गॅस पुरवला जातो. तसचं सौदी अरेबियातील गॅस डेपोंनाही इराणनं लक्ष्य केलयं...रियाधमधील एका रिफायनरीजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे तुकडे आढळलेत.

Gas War
जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

दरम्यान कतारवरील हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिंस फैसल यांनी इराणला कारवाईचा इशारा दिलाय. दुसरीकडे इराणनं कतारमधील गॅस डेपोंवर केलेल्या हल्ल्यामुळे जगावर गॅस टंचाईचं सावट आहे... अशातच इराणने हल्ले थांबवले नाहीत तर जग अराजकतेच्या खाईत लोटले जाईल, असा इशारा फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रोन यांनी दिलाय..तर ट्रम्प यांनीही इराणने पुन्हा एकदा कतारवर हल्ला केला तर अमेरिका स्वतः इराणचं साऊथ पार्स उद्धवस्त करेल, असा इशारा दिलाय... कतार जगातील एकूण LNG पुरवठ्यापैकी सुमारे 20% एनर्जी पुरवतो... युरोप आणि आशियातील देश कतारच्या या गॅसवर अवलंबून आहेत... हे हल्ले असेच सुरू राहिले तर अनेक देश या गॅस व़ॉरमध्ये होरपळले जातील हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com