

लुधियानात पंजाब पोलिसांनी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना ताब्यात घेतले.
पंजाब कृषी विद्यापीठाच्या गेटजवळ मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यादरम्यान बिट्टू यांनी निषेध केला.
या घटनेमुळे पंजाबमधील भाजप आणि सत्ताधारी आम आदमी पक्षातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
लुधियानामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यासमोर निदर्शने केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी रवनीत सिंग बिट्टू यांना ताब्यात घेतलंय.
शेतकऱ्यांच्या एका मेळाव्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री मान हे 'पीएयू' (PAU) येथे आलेले असताना ही घटना घडली. या घटनेची नोंदही घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ताफा पंजाब कृषी विद्यापीठाच्या (PAU) प्रवेशद्वाराजवळून जात होता. त्यावेळी तेथे आंदोलन करणाऱ्या भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या ताफा जात असताना बिट्टू यांनी आपल्याकडील मद्याची बाटली दाखवली. ही बाटली मुख्यमंत्र्यांना "परत करत" असल्याचे म्हटलं होतं. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना मद्याचा आनंद घेण्यास आणि अरविंद केजरीवाल यांना "दिल्लीतून पंजाबची लूट करू द्या " असं सांगितले.
दरम्यान शुक्रवारी भाजपच्या 'ड्रग-फ्री पंजाब यात्रा'साठी जात असताना बटालाजवळ आपल्या ताफ्यावर अंडी आणि टोमॅटो फेकले गेले, त्यावर बिट्टू यांनीही प्रत्युत्तर दिले. आपल्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यातील वाहनांचे नुकसान झाले, असा आरोप बिट्टू यांनी केला होता.
निदर्शनांनंतर बोलताना बिट्टू म्हणाले, "काल माझ्या ताफ्यावर अंडी आणि टोमॅटो फेकण्यात आले होते. आज मी त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. जर 'आप'चे कार्यकर्ते भाजप नेते, त्यांच्या रॅली आणि दौऱ्यांविरोधात निदर्शने करणार असतील, तर भाजपचे कार्यकर्तेही पंजाब सरकार आणि त्यांच्या नेत्यांविरोधात निदर्शने करण्याचा आपला लोकशाही अधिकार बजावतील. बिट्टू यांनी सांगितले की, भाजप पंजाबशी संबंधित प्रश्न उपस्थित करणे सुरूच ठेवेल. जेव्हा गरज भासेल तेव्हा मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमांच्या व कार्यालयाच्या बाहेर शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने निदर्शनेदेखील केले जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.