Madhya Pradesh Crime News: 'सैराट'ची पुनरावृत्ती! प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध, पोटच्या मुलीसह तिच्या बॉयफ्रेंडसोबत केलं भयानक कृत्य

Father Killed Daughter And Her Boyfriend: धक्कादायक बाब म्हणजे बापानेच आपल्या पोटच्या मुलीचा आणि तिच्या बॉयफ्रेंडची हत्या (Girlfriend And Boyfriend Killed) केली आहे.
Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh Crime NewsSaam Tv
Published On: 

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सैराटची पुनरावृ्ती झाली आहे. प्रमेसंबंधाला विरोध करत 21 वर्षीय तरुण आणि 18 वर्षांच्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बापानेच आपल्या पोटच्या मुलीचा आणि तिच्या बॉयफ्रेंडची हत्या (Girlfriend And Boyfriend Murder) केली आहे. या घटनेने मध्य प्रदेश हादरले आहे.

Madhya Pradesh Crime News
Rajasthan News: प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला, घरात अचानक मुलीच्या वडिलांनी दोघांना रंगेहात पकडले अन् मग...

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या शिवानी तोमर आणि राधेश्याम तोमर यांची हत्या करण्यात आली आहे. शिवानीच्या कुटुंबीयांनीच त्यांच्यासोबत हे धक्कादायक कृत्य केले आहे. आधी दोघांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून मगर असलेल्या नदीमध्ये टाकून दिला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Madhya Pradesh Crime News
Karnataka High Court: लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे क्रूरता नाही; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिपण्णी

शिवानीचे शेजारच्या गावामध्ये राहणाऱ्या राधेश्यामसोबत प्रेमसंबंध होते. पण शिवाजीच्या कुटुंबीयांना त्यांचे नातं मान्य नव्हते. ते या नात्याला विरोध करत होते. राधेश्याम हा बालुपूरा या गावामध्ये राहत होता. राधेश्याम आणि शिवानी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्यामुळे शेवटी राधेश्यामच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखलकेली. त्यानंतर पोलीस तपासात त्यांची निर्घृण हत्या झाल्याचे उघड झाले.

Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh News: धक्कादायक! तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधत कुत्र्यासारखं भुंकायला लावलं

राधेश्यामच्या वडिलांनी त्यांचा मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड शिवानीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता आणि तो खरा ठरला. पोलिसांना सुरुवातीला वाटले होते की दोघेही पळून गेले असावे. पण ते पळून जात असताना गावातील कोणीच पाहिले नव्हते त्यामुळे पोलिसांनी तपासाची सर्व सूत्र वेगळ्या अँगलने वळवली.

पोलिसांनी शिवानीचे आई आणि वडिलांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना देखील चौकशीसाठी बोलावले. बरीच तास या सर्वांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शिवानी आणि राधेश्यामची हत्या केल्याची कबुली दिली.

Madhya Pradesh Crime News
Odisha Railway Accident Update: CBI चौकशीनंतर सिग्नल इंजीनिअर कुटुंबासह गायब; ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

चौकशीमध्ये त्यांनी पोलिसांना सांगितले की, '3 जून रोजी आम्ही शिवानी आणि राधेश्याम यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह दगडांना बांधून चंबल नदीत फेकून दिले.' आपली पोटची मुलगी शिवानी आणि तिचा बॉयफ्रेंड राधेश्याम यांची निर्घृणपणे हत्या केली. हा संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

शिवानी आणि राधेश्याम यांची हत्या करुन ज्या चंबळ नदीमध्ये त्यांचा मृतदेह टाक्यात आला होता. त्या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात मगरी आहेत. या नदीमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त मगरी आहेत.पोलिसांकडून दोघांचेही मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. पण नदीमध्ये मगरी असल्यामुळे त्यांचे मृतदेह शोधणे खूपच अवघड झाले आहे. या घटनेमुळे मध्य प्रदेश हादरले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com